vanchit-bahujan-aghadi-leaders-join-eknath-shinde-shivsena : निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्र्यांचा नवा राजकीय डाव
Buldhana जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. वंचित बहुजन आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी अचानक शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मेहकर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटावर नवे समीकरण आकार घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Jitendra awhad : विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावरून गदारोळ
राजकारणात कोण कुठे वळण घेईल, याचा नेम नसतो, याची प्रचिती या घडामोडीतून पुन्हा एकदा आली आहे. विशेषत: नगरपालिका पातळीवर काही राजकीय समीकरणे हातातून निसटल्याची चर्चा असताना आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळा ठेवून ही नवी रणनीती आखली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक नसून पुढील राजकीय लढतीच्या दृष्टीने टाकलेली ‘राजकीय चाल’ असल्याचेही अनेकांचे मत आहे. जिल्ह्यातील इतर काही पक्षांतील पदाधिकारीदेखील सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसते. योग्य वेळ साधून काही नेते आणि कार्यकर्ते राजकीय दिशा बदलण्याची शक्यता असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
Shivsena UBT : सहा महिन्यांत ४६ कोटींच्या रस्त्यांची दुर्दशा; कार्यकारी अभियंत्याचा सत्कार
दरम्यान, जिल्ह्याच्या राजकीय पटावर ‘भाऊं’च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेतृत्वाची ही चाल किती दूरवर परिणाम घडवते, आणि आगामी निवडणुकांमध्ये कोणती नवी समीकरणे घडवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








