व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mahayuti government : सरकारमध्ये मंत्र्यांची मंत्रालयात दांडी, खासगी बंगल्यावरून कारभार !

Mahayuti government : सरकारमध्ये मंत्र्यांची मंत्रालयात दांडी, खासगी बंगल्यावरून कारभार !

mahayuti-government-ministers-absent-mantralaya-officers-taking-decisions-controversy : लाखो खर्चून सजलेली दालने रिकामी अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह

Mumbai: राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्री मंत्रालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचे चित्र समोर येत असून प्रशासनातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॅबिनेट बैठका वगळता इतर वेळेस अनेक मंत्री मंत्रालय येथे येत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याऐवजी हे मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरूनच बैठकांचे आयोजन करत असून तेथेच अधिकाऱ्यांशी चर्चा आणि निर्णयप्रक्रिया पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

या बैठकींसाठी मंत्रालयातील मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग आणि यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्यावर हलवली जात असल्याचेही समोर आले आहे. परिणामी मंत्रालयातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्र्यांच्या अनुपस्थितीतच अधिकाऱ्यांकडून घेतले जात असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे प्रशासनातील अधिकारांचे संतुलन बिघडल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

board marksheet certificate : दहावी-बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आता एकाच कागदावर मिळणार

दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. अशाच प्रकारची परिस्थिती इतर विभागांमध्येही असल्याची शक्यता वर्तवली जात असून मंत्र्यांच्या गैरहजेरीत अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याचा आरोप होत आहे.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांच्या दालनांच्या नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मंत्रीच मंत्रालयात येत नसल्याने या खर्चावर टीका होत आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे अनेक मंत्री आपल्या मतदारसंघात अधिक वेळ घालवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाल्याचेही समोर येत आहे.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाच्या फाईलींची निकाली काढणी विलंबाने होत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जाणवत असल्याचे काही अधिकाऱ्यांनीही सूचित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याने जबाबदारीचे स्वरूपही अस्पष्ट होत चालले आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून मंत्रालयात मंत्रीच नसतील, तर प्रशासनावर नियंत्रण कोणाचे, असा सवाल उपस्थित केला आहे. मंत्र्यांनी नियमितपणे मंत्रालयात उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी मागणीही होत आहे. प्रशासनातील शिस्त राखण्यासाठी स्पष्ट जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Ashok kharat case : भोंदूबाबा प्रकरणात नाट्यमय घडामोडी; पत्नी फरार तर मुलगा पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असून त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची प्री-कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता असून पक्षाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच झिरवाळ मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतात की नाही, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!