Suspicion of a Pakistan link in the grenade attack outside BJP office : सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती, आरोपी दुचाकीने पळून गेले
New Delhi चंदीगडमधील सेक्टर-३७ येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चंदीगड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. या स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. त्याचबरोबर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
समोर आलेल्या फुटेजमध्ये हल्लेखोर हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी भाजप कार्यालयाजवळ उभे असल्याचे दिसत आहे. तसेच एक संशयित व्यक्ती ग्रेनेड फेकताना स्पष्टपणे दिसून येतो आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे आणि दुचाकीच्या मदतीने पसार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केली असून, हल्लेखोर ज्या मार्गाने पळून गेले तो मार्ग पंजाबमधील मोहाली जिल्ह्याकडे जात असल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने त्या दिशेने नाकाबंदी करून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीची चाहूल; ९ जागांसाठी हालचालींना वेग
या हल्ल्यासाठी ‘जीएचडी२पी’ प्रकारचा ग्रेनेड वापरण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, अशा प्रकारचे ग्रेनेड पाकिस्तानमध्ये तयार केले जातात, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. हा स्फोट बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घाबरले आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.








