व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Khamgao APMC : खामगाव बाजार समिती वर्षभरात 165 दिवस बंद, केवळ 200...

Khamgao APMC : खामगाव बाजार समिती वर्षभरात 165 दिवस बंद, केवळ 200 दिवसच कामकाज

Khamgao APMC worked only for 200 days in last one year : सार्वजनिक सुट्ट्या, बंद, आंदोलन आणि अघोषित दांड्यांचा शेतकऱ्यांना बसला फटका

Khamgao आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणतात. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगावात वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी केवळ २०० ते २३० दिवसच कृउबासमध्ये प्रत्यक्ष व्यवहार सुरू राहत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उर्वरित दिवस सार्वजनिक सुट्ट्या, विविध आंदोलनं, मोर्चे, बंद आणि अघोषित कारणांमुळे व्यवहार ठप्प राहत असल्याने शेतकर्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात आपला शेतमाल विक्री करावा लागत आहे.

Uddhav Thackeray Shivsena: दोन्ही शिवसेनेत ‘इनकमिंग’ची स्पर्धा, आता शेकडो कार्यकर्त्यांसह ६ विद्यमान, ८ माजी सरपंच उद्धवसेनेत

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जिल्ह्याबाहेरील शेतकरीदेखील आपला शेतमाल विक्रीसाठी येथे आणतात. मात्र वारंवार होणारे बंद, रविवार, सार्वजनिक सुट्ट्या, हमाल-मापाऱ्यांची आंदोलनं, अडते-व्यापाऱ्यांकडील दुःखद घटना किंवा राजकीय संघटनांनी पुकारलेले बंद यामुळे कृउबासमधील व्यवहार अनेकदा अचानक थांबवले जातात.
अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता कृउबास बंद ठेवली जाते. परिणामी, बाहेरगावाहून धान्य घेऊन आलेली वाहने बाजार समितीच्या गेटवरूनच परत पाठवावी लागतात. वाहतूक खर्च, मजुरी, वेळ आणि मालाच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

मापातील फरक, भावातील तफावत किंवा इतर तांत्रिक कारणांवरून शेतकरी स्वतः घोषणाबाजी करत काही तास किंवा पूर्ण दिवस बाजार बंद पाडतात. त्यामुळे वर्षातील सुट्ट्यांची संख्या १५० हून अधिक दिवसांपर्यंत पोहोचते, आणि प्रत्यक्ष व्यवहाराचे दिवस २१० पेक्षाही कमी राहतात.
अडते, व्यापारी, हमाल किंवा मापाऱ्यांपैकी कोणाकडेही दुःखद घटना घडल्यास दुखवट्याच्या कारणावरून बाजारातील व्यवहार बंद ठेवले जातात. कार्यालयीन कामकाज सुरू असले तरी धान्य खरेदी-विक्री ठप्प असल्याने शेतकऱ्यांना त्याचा काहीही उपयोग होत नाही.
विशेष म्हणजे, मार्च एंडिंगच्या नावाखाली तब्बल पाच दिवस व्यवहार बंद ठेवले जातात, ही बाबही शेतकरी वर्गात संतापाचा विषय ठरत आहे. आजच्या संगणकीकृत युगात हिशेब व लेखापरीक्षण काही तासांत पूर्ण होऊ शकते, तरीही पाच दिवस बाजार बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकर्रयांना फटका बसतो.

error: Content is protected !!