व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sindkhedraja municipal council : सिंदखेडराजा नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...

Sindkhedraja municipal council : सिंदखेडराजा नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

NCP alleges corruption in Sindkhed Raja Municipal Council : नगरोत्थान विकासकामांत अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि शासन फसवणुकीचा गंभीर आरोप

Sindkhedraja राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सिंदखेडराजा नगरपरिषदेत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ‘नगरोत्थान’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत हा आरोप झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, शहरात टाकण्यात येत असलेली पाणीपुरवठा पाइपलाइन अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. ज्या ठिकाणी जमिनीचा भाग मऊ आहे, त्या ठिकाणीही कागदोपत्री ‘रॉक एक्स्कॅवेशन’ दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर मुद्दा नगरसेवकांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.

Congress srujan campaign : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर गंडांतर, सृजन अभियानाचा फटका!

याशिवाय, जॉइंटिंग आणि प्रेशर टेस्टिंग न करताच काम उरकले जात असल्याने भविष्यात पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भुयारी गटार योजनेच्या कामातही तांत्रिक निकषांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून, सांडपाण्याला आवश्यक उतार न दिल्याने योजना अपयशी ठरण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.

शहरातील अनेक भागांत रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, निकृष्ट विटा आणि सिमेंटचा वापर केल्याने कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छता, पथदिवे, ब्लिचिंग पावडर आणि इतर नागरी सुविधांच्या कामांतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार

या तक्रारीवर नगरसेवक निलेश ठाकरे, सारिका मेहेत्रे, श्रीमती हाजरा नुजहत काझी, कैलास म्हस्के, संतोष मेहेत्रे, आवेज खान, श्रीमती जास्मिन अजीम तांबोळी आणि श्रेया खरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सामूहिक तक्रारीमुळे सिंदखेडराजा नगरपरिषदेतील विकासकामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून चौकशीची होत आहे. या आरोपांमुळे शहरातील स्थानिक राजकारणात सत्ताधारी विरुद्ध विरोधक संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

error: Content is protected !!