Breaking

Ladki Bahin Yojna : व्यक्ती एक, योजना अनेक… आता चालणार नाही!

 

One person cannot take the benefit of more than one scheme : कुठल्याही एकाच योजनेते होऊ शकता लाभार्थी; ‘त्या’ निराधारांचे पैसे बंद होणार

Nagpur एकच व्यक्ती शासनाच्या अनेक योजनांची लाभार्थी ठरत होती. मात्र आता ते चालणार नाही, असं स्पष्ट दिसत आहे. कारण शासनाने कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांना लाडकी बहीण योजनेला किंवा निराधार योजनेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निकष लावले जाणार आहेत. या निकषांमुळे किती बहिणी योजनेच्या बाहेर पडतात, हे येत्या काळात कळणार आहे.

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकणार आहेत. जे लाभार्थी शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे अनुदान घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचेही अनुदान घेत आहेत. अशांना दोन पैकी एकाच योजनेचे अनुदान मिळेल. दुसऱ्या योजनेचे अनुदान बंद केले जाईल.

Padmashree Dr. Vilas Dangre : राजकारणापासून अलिप्त; वाजपेयी, अडवाणींचे विश्वासू डॉक्टर!

 

६५ वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी महिलांना यापैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही अनेकांनी कागदपत्रे जमा केलेली नाही.

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे, आधार, बँक पासबुकची झेराक्स जमा करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक झोननिहाय शिबिरेसुद्धा घेण्यात आली. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात ही कागदपत्रे जमा करता येतील.

Ex-Minister Sudhir Mungantiwar : मुल येथील Government Politechnic साठी सरकारचे पाऊल पडते पुढे

 

 

सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकूण अर्जांपैकी सदोष किंवा मानवी चुकांमुळे त्रुटीयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाईल. यातून पात्र नसलेल्यांची नावे गाळली जातील. कागदपत्रच जमा झाले नाही तर अशांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. या योजनेतून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वगळण्यात आले आहेत. असे असले तरी काहीजण या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ नये यासाठी आता पडताळणी केली जात आहे. यामध्ये लाभार्थ्यांना दाेनपैकी केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी स्पष्ट केले आहे.