Trend of new entrepreneurs towards food processing industry : सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी कर्जाचे २२२२ अर्ज
Wardha सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्राला कर्जाचे २ हजार २२२ प्रस्ताव आले. त्यातील अधिकाधिक प्रस्ताव हे मिल्क प्रोडक्ट्स, अन्नप्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रॉनिक, रेडिमेड गारमेंट्स, फॅशन डिझायनिंग, ब्युटीपार्लर, डिजिटल प्रिंटिंग आदीसाठी आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. विशेषतः अन्नप्रक्रिया उद्योगांकडे विशेष कल दिसून येत आहे. यावरून पारंपरिक उद्योगांपेक्षा इतर उद्योगांकडे लोक वळत असल्याचे स्पष्ट होते.
मागील वर्षभरामध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडे ऑनलाइन पद्धतीने २,२२२ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १६१ जणांना कर्ज मंजूर करण्यात आले, तर ६७० प्रस्ताव बँककडे पेंडिंग आहेत. सूक्ष्म उद्योग आणि व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मागील वर्षभरात २ हजार २२२ कर्जाचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले होते. त्यापैकी १६१ प्रस्तावांना बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात आले. परंतु बँकेकडे ६७० प्रस्ताव पेंडिंग आहेत.
Social Responsibility : मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या संस्थेसाठी पुढे आले महिला मंडळ
सूक्ष्म उद्योग व व्यवसाय करण्यासाठी अनेकांकडे भांडवल नसते. भांडवल उभारण्यासाठी संबंधितांना कर्ज काढावे लागते. परंतु बँकेकडून हे कर्ज सहजासहजी उपलब्ध होत नाही. बँकेकडून विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. तसेच अटी, शर्त लावल्या जातात. या अटींची पूर्तता न करणाऱ्या अर्जदाराला योजनेचा लाभ दिला जात नाही. जिल्ह्यात उद्याेग केंद्रामार्फत कर्ज मंजूर केले जातात. मात्र, बँकांकडून सहजासहजी कर्ज उपलब्ध केले जात नाही.
सूक्ष्म उद्योग व व्यवसाय योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत अनेक लहान व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज केले आहेत. उत्पादन व सेवा उद्योगासाठी कर्ज हवे असल्यास संबंधितांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा. आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करावा लागणार आहे.
Bogus Crop Insurance : बनावट पीकविमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक करणार
जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाइन कर्जाचा प्रस्ताव भरायचा आहे. त्यानंतर कारला चौक येथील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येतो. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कर्ज योजना सुरू केली आहे. उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा सदर योजनेचा उद्देश आहे.
सुशिक्षितांना उद्योगासाठी कर्ज हवे असेल तर अशांनी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने कर्जाचा प्रस्ताव भरुन घ्यावा. पात्र उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. सरकारच्या या योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ द्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.