Breaking

50 Years of Emergency : आणीबाणी सेनानींच्या सत्कारासाठी अधिकारी व्यासपीठावरून खाली आले

Administration honors those imprisoned during the Emergency : आणीबाणीत कारावास भोगलेल्या सन्मानधारकांचा प्रशासनाकडून गौरव

Nagpur आणीबाणीत कारावास भोगलेल्या सन्मानधारकांचा नागपूर प्रशासनाकडून गौरव करण्यात आला. वयोवृद्ध आणीबाणी सेनानींचा सत्कार करण्यासाठी प्रशासनातील सर्वच अधिकारी व्यासपीठ सोडून खाली आले. त्यांनी सेनानींजवळ जाऊन त्यांना प्रमाणपत्र दिले व कृतज्ञता व्यक्त केली.

देशावर लादलेल्या आणीबाणीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपल्या घरादाराचा विचार न करता अनेकांनी कारावास भोगला. त्यांच्या या योगदानाप्रती शासनातर्फे आज कृतज्ञता व्यक्त करुन कारावास भोगलेल्या सन्मानार्थींचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.

Vijay Wadettiwar : महिला पोलिसही सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य महिलांचे काय ?

सदर येथील नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त तेजुसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी मिसाबंदींना त्यांच्या जागेवर जाऊन सन्मानपत्र बहाल केले.

आणीबाणीमध्ये जेलमध्ये जाणे पसंत केलेल्या सर्व सन्मानार्थींनी देशाची लोकशाही वाचविली. एक प्रकारे लोकशाहीच्या रक्षणाचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले. देशावर लादलेल्या हुकूमशाहीचा धाडसाने प्रतिकार करुन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी केलेला संघर्ष व दिलेले योगदान मोलाचे असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या.

NMRDA : क्या बात! हिंगणा येथे विकसित होणार ‘नवीन नागपूर’!

देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. संविधान हत्या दिवस पाळतांना आपण सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढण्याचा निर्धार आणखी दृढ करु अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाद्वारे व्यक्त केल्या. या संदेशाचे वाचन तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सर्व सन्मानार्थींना शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.