Breaking

Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती

 

Speeding up the work of Warkari Bhawan in Nagpur : १८ कोटी मंजूर; सोमवारी क्वॉर्टरला साकारणार प्रकल्प

Nagpur उपराजधानीत वारकरी भवन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दक्षिण नागपूर परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथे नागपूर सुधार प्रन्यासद्वारा हा प्रकल्प साकारण्यात येईल. नासुप्रने या कामाला सुरुवात केली आहे.

उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात वारकरी सांप्रदायाचा विस्तार खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाला समर्पित विविध उपक्रम राबविण्यासाठी शहरात वारकरी भवन निर्माण व्हावे, या उद्देशाने विश्व वारकरी सेवा संस्थेद्वारा शासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. आमदार मोहन मते यांनीही यासाठी शासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला.

Amravati Congress: काँग्रेस Confident, महापालिका निवडणूक जिंकणारच!

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. प्रत्येक वारकऱ्याला अभिमान वाटावा, असा बहुप्रतीक्षित, अद्ययावत सुविधा असणाऱ्या वारकरी भवनाचा प्रकल्प साकारण्यात येत असल्याचा आनंद वारकरी बांधवांनी व्यक्त केला.

विश्व वारकरी सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भवनाचा आरखडा तयार करण्यात आला आहे. १६२९६ चौरस फूट असलेल्या प्रशस्त जागेत पार्किंगसह चारमजली भव्यदिव्य इमारत उभी राहणार आहे. हा प्रकल्प वारकऱ्यांच्या हिताचा असल्याने वारकरी भवनाचे बांधकाम व पुढील व्यवस्थापन विश्व वारकरी सेवा संस्थेच्या देखरेखीखाली होणार आहे.

Nagpur municipal corporation: शहरातील रस्तेच झाले डम्पिंग यार्ड!

संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनात हे व्यवस्थापन होणार आहे. अशी माहिती विश्व वारकरी सेवा संस्थेकडून देण्यात आली. वारकरी भवनाच्या माध्यमातून विविध सेवाकार्ये राबविण्यात येतील. वारकरी संतपीठाद्वारे संतांनी दिलेला संदेश प्रभावीपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.