वाशीम
Confusion among members over Zilla Parishad extension : जिल्हा परिषदेच्या मुदतवाढीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
Washim जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या 16 जानेवारी राेजी संपणार आहे. आपला कार्यकाळ संपण्यास 13 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात जास्तीत जास्त विकास कामे करण्यावर पदाधिकारी आणि सदस्यांचा भर असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देणे किंवा जिल्हा परिषदवर प्रशासक नियुक्त करणे, हे दोन पर्याय प्रशासनाकडे आहेत. यातील जिल्हा परिषदवर प्रशासकांची नियुक्ती होण्याची जास्त शक्यता आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची निवडणूक 7 जानेवारी 2020 रोजी झाली होती. तर 8 जानेवारीला निकाल लागला. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा 17 जानेवारी 2020 ला झाली. पहिल्या सभेपासून जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 16 जानेवारी 2025 रोजी पूर्ण होतो. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ मिळते की प्रशासकाची नियुक्ती होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
BJP Congress Nagpur Zilla Parishad : भाजप-काँग्रेसचे ‘हम साथ साथ है’!
न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेला मुदतवाढ देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासकाची नियुक्ती झाल्यास पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येईल. त्यामुळेच पदाधिकारी व सदस्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली आहे. मुदतवाढ मिळाल्यास कामे करायला मिळतील. त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लाभ होईल, असा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.
सर्कलमधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यास पदाधिकारी आणि सदस्यांना निवडणुकीला सामाेरे जावे लागणार आहे. त्यामुळे, आपल्या सर्कलमधील अपूर्ण राहलेली विकास कामे पूर्ण करण्यावर सदस्यांचा भर आहे. कारण सर्कलमधील कामे अपूर्ण राहील्यास निवडणूक प्रचारादरम्यान त्याबाबत विचारणा केली जाईल. म्हणून जिल्हा परिषदअंतर्गत येत असलेली कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विभागीय कामांचा आढावादेखील घेतला जातो.
लाभार्थ्यांना याेजनांचा लाभ
जिल्पहा परिषदेअंतर्गत रस्ते बांधकाम, इमारत बांधकाम, घरकुल मंजूर करून घेणे आदी कामे आहेत. विविध विभागांतील शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी धडपड सुरू आहे. संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय इतरही बरीच लहान मोठी कामे आहेत, ज्यासाठी पदाधिकारी सक्रीय झाले आहेत.