Breaking

Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

Blast in gunpowder factory in Kalameshwar ‘ दोन कामगाराचा मृत्यू; तीन कामगार गंभीर जखमी

Nagpur कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबड्डी-एनबेर परिसरात असलेल्या एशियन फायर वर्क्स या बारूद कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात दोन मजूर ठार झाले असून दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे मोठी गर्दी केली आहे. या स्फोटात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. भुरा लक्ष्मण रजक (२५, रा. भिल्मा, शिवनी-मध्यप्रदेश) आणि मुनीत मडावी (३१,रा. घुंनटी, ता. मंडला, शिवनी-मध्यप्रदेश) अशी स्फोटात मृत पावलेल्या कामगारांची नावे आहेत. जखमींमध्ये सौरभ मुसळे (२५, रा. डोर्ली), साहिल दिलावर शेख (२६), घनशाम लोखंडे (५५, रा. डोर्ली, ता. काटोल) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

Indurikar Maharaj : सैन्यात शेतकऱ्यांची मुलं, ही शिवरायांची किमया !

कळमेश्वर तालुक्यातील एनबेर-कोतवालबर्डी गावाजवळ एशियन फायर वर्क्स कंपनी असून या कंपनीत फटाक्यात भरण्यात येणारा मसाला (बारुद) बनविण्यात येते. या कंपनीत जवळपास ४० ते ५० कामगार काम करतात. रविवारी १७ पुरुष आणि १६ महिला असे एकूण ३३ कामगार कंपनीत काम करीत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास बारुद बनविण्याचे काम सुरु होते.

जेवणाची सुटी झाल्यामुळे कामगार डबे घेऊन कंपनीच्या बाहेर गेले तर सहा ते आठ मजूर कंपनीतच मिक्सिंगचे काम करीत होते. दरम्यान अचानक बारुदचा स्फोट झाला. त्यामुळे कंपनीला आग लागली. आगीत बारुद सापडल्यामुळे आग वाढतच गेली. या स्फोटात दोन मजूर ठार झाले तर तीन मजूर गंभीर जखमी झाले. जखमींंना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अनिल म्हस्के यांनी घटनास्थाळावर ताफ्यासह धाव घेतली. कळमेश्वर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

आगीवर मिळवले नियंत्रण
एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोटामुळे मोठी आग लागली. कंपनीत ठेवलेले सर्व गठ्ठे आणि सामान आगीत जळाले. पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाची सहा वाहने कंपनी पोहचली. त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करीत दोन तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही वेळातच रुग्णावाहिका पोहचल्या. गंभीर जखमींनी लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Hasan Mushrif : मुश्रिफांना विश्वास, राज्य होईल Medical tourism centre !

एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट होताच मोठा आवाज झाला तसेच कंपनीला आग लागली. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील अनेकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटांतच स्फोटाची वार्ता अनेकांपर्यंत पोहचली. त्यामुळे कंपनीत गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकऱ्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना मदत केली. मात्र, अनेक जण बघ्याच्या भूमिकेत असल्यामुळे पोलिसांनाही कर्तव्य बजावताना अडचणीचे ठरत होते, हे विशेष.