Breaking

Akash Fundkar : काळ बदलला, पोलीस खातेही बदलायला हवे!

Police department needs to be updated technically : जलंब व पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन

पोलीस खाते बदलत्या काळानुसार अद्ययावत आणि सुविधायुक्त असावे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल. आता काळ बदलला आहे. सगळीकडे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस खातेही बदलायला हवे, अशी अपेक्षा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली. जलंब व पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उपअधीक्षक कारखेडे, तहसीलदार दीपक बाजड आदी मान्यवर आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पुर्ण होईल!

फुंडकर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून पोलिसांसाठी स्वतंत्र व आधुनिक कार्यालय मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. हिवरखेड, जलंब, पिंपळगाव राजा, खामगाव ग्रामीण आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालय इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच कार्यादेश काढला जाणार आहे. याशिवाय, पिंपळगाव राजा, जलंब, मेहकर आणि जळगाव जामोद येथे नवीन पोलीस स्टेशनच्या इमारती मंजूर झाल्या आहेत.

जलंब पोलीस स्टेशनची इमारत १९१७ सालची असून ती अत्यंत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीसाठी १३,४०० चौ. मीटर क्षेत्रावर आधुनिक सुविधा असलेले पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. या इमारतीत सीसीटीव्ही यंत्रणा, ऑनलाइन एफआयआर सुविधा आणि आधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Prataprao Jadhav : ‘देश का प्रकृती परीक्षण’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ५ जागतिक विक्रमांची नोंद

विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कृती आराखड्यातील पोलीस सुधारणा उपक्रमांतर्गत नवीन इमारतींची उभारणी केली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष देशमुख, तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक गुजर यांनी केले.