व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Prataprao Jadhav : ‘देश का प्रकृती परीक्षण’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ५ जागतिक...

Prataprao Jadhav : ‘देश का प्रकृती परीक्षण’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ५ जागतिक विक्रमांची नोंद

‘Country Health Check’ sets 5 world records in Guinness Records : केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वीकारली प्रमाणपत्रे

Buldhana : आयुष मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानात १ कोटी २९ लाखांहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या अभियानात ५ जागतिक विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग यांनी मुंबई येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या विक्रमांची अधिकृत घोषणा केली आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.

भारतीय आयुर्वेदासाठी जागतिक सन्मान..
ही कामगिरी भारतीय आयुर्वेदासाठी अभिमानास्पद बाब आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने स्थापन केलेल्या आयुष मंत्रालयाची जबाबदारी बुलढाण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवली होती. गेल्या नऊ महिन्यांत आयुष मंत्रालयाने शासकीय रुग्णालयांमध्ये अमृत औषधालयांसह आयुर्वेद, युनानी आणि योगासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची तोफ मंगळवारी पुन्हा धडाडणार!

‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानाचे ऐतिहासिक यश..
गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान राबविण्यात आले. एका महिन्यात १ कोटी नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र हे लक्ष्य पार करून १ कोटी २९ लाख नागरिकांचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. यामुळे हा उपक्रम आयुष मंत्रालयासाठी जागतिक विक्रम ठरला.

Jaykumar Rawal : बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद उद्या पुण्यात

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची अधिकृत घोषणा..
मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अ‍ॅडज्युकेटर रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग यांनी या नोंदीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी या अभियानांतर्गत ५ जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचे जाहीर केले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या पाचही विक्रमांची प्रमाणपत्रे स्वीकारली.

error: Content is protected !!