व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Sign in
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • प्रशासकीय
  • संपादकीय
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
  • Sign in / Join
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Sattavedh
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • प्रशासकीय
  • संपादकीय
Home महाराष्ट्र Nitin Gadkari : विदर्भात होणार फार्मर बिझनेस स्कूल?
  • महाराष्ट्र

Nitin Gadkari : विदर्भात होणार फार्मर बिझनेस स्कूल?

March 2, 2025
  • Team Sattavedh

Vidarbha also needs a Farmer Business School like Spain : गडकरींनी स्पेन दौऱ्यानंतर मांडली संकल्पना

Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच विदर्भातील शेतकऱ्यांसोबत स्पेनचा दौरा केला. स्पेनमधील व्हॅलेन्शिया Valencia या शहरात संत्र्याच्या एकरी उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. याबाबत माहिती देताना गडकरींनी आज (रविवार, दि. २ मार्च) फार्मर बिझनेस स्कूलची Farmer Business School संकल्पना मांडली. स्पेनच्या धरतीवर विदर्भातही अशाप्रकारच्या व्यवस्थेची गरज आहे, असं गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एखादी संकल्पना मांडतात, तेव्हा ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी ते जिद्दीने कामाला लागतात. त्यामुळे विदर्भात येत्या काळात फार्मर बिझनेस स्कूलची घोषणा झाल्यास नवल वाटायला नको. धापेवाडा येथील कार्यक्रमात गडकरी बोलत होते. त्यावेळी संत्रा पिकाबद्दल बोलताना त्यांनी स्पेनच्या दौऱ्याची माहिती दिली.

Nitin Gadkari in Advantage Vidarbha : विदर्भात साडेसात लाख कोटींची गुंतवणूक

 

ते म्हणाले, ‘पूर्वी संत्रा हे या भागातील मुख्य पिक होते. पण आज एका एकरात चार ते आठ क्विंटल संत्रा होतो. स्पेनमध्ये मात्र ३० ते ४० क्विंटलपर्यंत संत्रा होतो. स्पेनच्या दौऱ्यात संत्र्याचे उत्पन्न जास्त असण्याचे कारण आम्ही जाणून घेतले. तेथील शेतकऱ्यांना विहीर खोदून जमिनीतील पाणी काढण्याची परवानगी नाही. दोनशे किलोमीटरवरून येणाऱ्या पाईपलाईनने शेतकऱ्यांना पाणी मिळते. तरीही त्यांना संत्र्याचे उत्पादन जास्त घेणे शक्य आहे. तर मग आपण का घेऊ शकत नाही?’

Nitin Gadkari : राजकारण हेच समाजकारण अन् धर्मकारण!

यावेळी स्पेनमधील फार्मर बिझनेस स्कूलला भेट दिल्याचे गडकरींनी सांगितले. ‘फार्मर बिझनेस स्कूलमध्ये आम्ही गेलो तेव्हा त्या शाळेतील संचालक मंडळात नारायण मूर्ती असल्याचे आम्हाला कळले. योगायोगाने त्याचवेळी नारायण मूर्तींचे भाषण तिथे सुरू होते. त्यांचे पाच मिनिटांचे भाषण ऐकल्यावर आपली जबाबदारी वाढल्यासारखे वाटले,’ असं गडकरी म्हणाले.

त्याच क्षणी विदर्भातही फार्मर बिझनेस स्कूल सुरू करण्याची गरज आहे, असे वाटले. आपल्या भागातील युवा शेतकऱ्याने कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार केले पाहिजे, असा त्यामागचा उद्देश आहे, असंही गडकरी म्हणाले.

  • TAGS
  • Business School like
  • Farmer
  • Nitin Gadkari
  • Spain
  • vidarbha
Team Sattavedh

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Ajit Pawar accident : अजित पवारांच्या अपघातावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम

Mahayuti government : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, जीआर निघाला, मात्र अनुदान निघालेच नाही, भाजपचे आमदारच हतबल

Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

Bacchu Kadu : तर वनमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा

Team Sattavedh - March 5, 2026 0
bacchu-kadu-warns-to-protest-at-forest-minister’s-house : मेळघाटातील प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन Amravati मेळघाटातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या संघर्ष महापदयात्रेला आता आक्रमक वळण मिळाले आहे. हजारो समर्थकांसह आमदार बच्चू...

PWD road fund : नगरपरिषदेला डावलून निधी PWD कडे; ५ कोटींच्या निधीवरून राजकीय वाद

Team Sattavedh - March 5, 2026 0
sindkhed-raja-municipal-council-fund-diverted-toPWD : सिंदखेडराजात रस्त्याच्या अनुदानावरून संघर्ष, राजकारण होत असल्याचा आरोप Sindkhedraja शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा विशेष रस्ता अनुदान निधी आता वादाच्या...

attack on thackeray leader : शिवसेना शहरप्रमुखावर हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?; राजकीय पाठबळाचा संशय

Team Sattavedh - March 5, 2026 0
political-hand-suspected-in-attack-on-shivsena-thackeray-city-leader : पोलीस अधीक्षकांना कुणबी समाजाचे निवेदन; चौकशी करण्याची मागणी Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार...

Akola Municipal Corporation : ८ जागांसाठी ५० इच्छुक; ८७ नामनिर्देशनपत्रांचे वितरण

Team Sattavedh - March 5, 2026 0
87-nomination-forms-for-8-posts : अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी चुरस,९ मार्चला मनपाच्या दोन सर्वसाधारण सभा Akola अकोला महानगरपालिकेत स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या आठ पदांसाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली...

Rajya Sabha Election : एकनाथ शिंदेंनी साधला ‘सोशल बॅलन्स’, दलित चेहऱ्याला संधी

Team Sattavedh - March 5, 2026 0
eknath-shinde-nominate-jyoti-waghmare-for-rajyasabha-seat : वेटरची मुलगी ते संसद भवन, ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत Mumbai महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अत्यंत अनपेक्षित आणि...
‘सत्तावेध’ हे महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘सत्तावेध’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘सत्तावेध’चा उद्देश आहे.

रक्षा भोयर

व्यवस्थापकीय संपादक (Managing Editor)

संपर्क क्रमांक - 92840 02429
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
  • Contact Us
© Powered by ContentOcean Infotech Private Limited.
error: Content is protected !!