Breaking

Prakash Ambedkar : वंचितच्या राष्ट्रीय कार्यसमितीची घोषणा !

Vanchit Bahujan Aghadi : National Working Committee is declared

Akola लोकसाभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सपशेल अपयश स्वीकारावे लागले. पण पक्षाला नव्या दमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यसमितीची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे माध्यम प्रमुख सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये चांगली स्थिती असूनही वंचित बहुजन आघाडीला लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्येही अपयशाचा सामना करावा लागला. सक्षम नेतृत्व असले तरी अकोला जिल्ह्याच्या बाहेर पक्ष संघटन मजबूत नसल्यामुळे पक्षाला या अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.

Co-operative Sector : सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी मुहूर्त सापडला!

त्याची सुरुवात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीपासून करण्यात आली आहे. नंतर राष्ट्रीय कार्यसमिती ही जाहीर करण्यात आली आहे. ही समिती पक्षाच्या आगामी ध्येयधोरणाबाबत निर्णय घेणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची पक्षात वाढलेली सक्रियता बघता त्यांच्या नेतृत्वात एक मजबूत संघटन वंचित बहुजन आघाडीतर्फे निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होताना दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत निवडणुका 10 डिसेंबर 2024 रोजी शेगाव येथे झाल्या. नवीन 12 सदस्यीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कार्य समितीचे नेतृत्वही आंबेडकरांकडेच
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकर्त्यानंतर पक्षाची राष्ट्रीय कार्य समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाच्या वरिष्ठ विचारवंत नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हेच या समितीचेही नेतृत्व करणार आहेत.

राष्ट्रीय कार्यसमिती

1. डॉ. अरुण सावंत – वरिष्ठ उपाध्यक्ष
2. डॉ. क्रांती सावंत – उपाध्यक्ष
3. ॲड. प्रियदर्शी तेलंग – सरचिटणीस
4. महेश भारतीय – खजिनदार
5. सय्यद खतीब नतीकोद्दीन – सचिव, धार्मिक अल्पसंख्यांकांसह समन्वय
6. राहुल गायकवाड — सचिव, इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट
7. अरुंधती शिरसाठ – सदस्य
8. अशोक सोनोने – सदस्य
9. दिशा पिंकी शेख – सदस्य
10. प्रा. किसन चव्हाण – सदस्य
11. डॉ. नितीन ढेपे – सदस्य
12. सविता मुंडे – सदस्य
13. सुजाता वालदेकर – सदस्य