Elections of cooperative societies will be held in February : अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता
Amravati जिल्ह्यात सहकार विभागांतर्गत 151 संस्थांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे. या संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने 3 जानेवारीला आदेश काढले. निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे 6 जानेवारीपासून या सर्व संस्थांमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या निवडणुकांमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांवर राजकीय नेत्यांचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अमरावती जिल्ह्यातील 151 सहकारी संस्थांच्या निवडणुकीला फटका बसला होता. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा 31 डिसेंबरपर्यंत या संस्थांची निवडणूक आहे. त्या टप्प्यावरून पुढे ढकलण्यात आली होती.
जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात 88 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये मजूर सहकारी संस्था, बेरोजगारांच्या संस्था, पाणी वापर संस्था, औद्योगिक कामगार संस्था यांसह अनेक लहान सहकारी संस्थांचा समावेश आहे. याशिवाय पतसंस्था, सहकार सोसायटी सारख्या 37 ‘ब’वर्गीय सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तसेच 10 लाखांच्यावर व्यवहार असणाऱ्या 26 ‘क’ वर्गीय सहकारी संस्थांच्या निवडणुकाही प्रलंबित होत्या.
आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे लवकरच या सर्व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या सर्व संस्थांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाने सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
Prahar Bachhu Kadu, Pravin Tayde : ‘प्रहार’चे गावगुंड आमदारावर हल्ला करू शकतात!
मतदार याद्यांकडे लागले लक्ष
63 सहकारी संस्थांपैकी ब वर्ग 37 संस्थांना जिल्हा उपनिबंधक व क वर्गीय 26 सहकारी संस्थांना मतदार यादी मागविण्यासाठी पत्र मिळणार आहे. त्यानंतर त्या संस्थांकडून निवडणूक निधी प्राप्त होईल. नंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.








