Sanjay Nirupam, Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा कमिशनसाठी कंत्राटदारांवर दबाव!

 

Aditya Thackeray is pressuring contractors for commission : अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसचा यू-टर्न

Mumbai : मागील २५ वर्ष मुंबई महापालिकेवर उबाठाची सत्ता होती. मात्र कधीही ते नालेसफाईची कामे पाहण्यासाठी गेले नाहीत. या उलट त्यांनी रस्त्यांची कामे, नालेसफाई आणि इतर कामांमधून कमिशन घेतले. आता सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे रस्ते आणि नालेसफाईची कामे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आदित्य ठाकरेंकडून कमिशन मिळवण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

मुंबईत आज (१० एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम म्हणाले, नालेसफाईच्या कामांची पाहणी हे आदित्य ठाकरेंचे ढोंग आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. ज्यामुळे मुंबई खड्डेमुक्त झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर निरूपम यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका त्यांनी

Chandrashekhar Bawankule, Pankaj Bhoyar : मंत्री येती घरा, प्रशासन पळती भरा भरा..!

अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेपासून पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, याचा निरुपम यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची आजवर जी काही राष्ट्रीय अधिवेशनं झाली, त्यात देशासाठी, ग्रामस्वराज्यासाठी, आर्थिक उदारीकरणासाठी, बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे ठराव मंजुर केले होते. प्रत्येक अधिवेशनात काँग्रेसकडून भारतीय समाजात जाती, भाषा धर्माच्या नावाने विभक्त करणाऱ्या शक्तींचा विरोध करणारा ठराव केला जात होता.

अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने पूर्णपणे यू-टर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कोणताच ठराव केला नाही. याउलट काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला. यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याचा काँग्रेसचा छुपा अजेंडा असल्याचे ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !

काँग्रेसची वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने सुरु झाली आहे. प्रादेशिक पक्षांकडून जाती धर्माच्या आधारे व्होटबँकेचे राजकारण केले जाते. त्याप्रमाणे काँग्रेस राजकारण करणार, हे निंदनीय आहे. ओबीसी मतांसाठी केलेला ठराव म्हणजे काँग्रेसचे दळभद्री राजकारण आहे, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. काँग्रेसच्या जाती-जमातीवर आधारीत ठरावाला उबाठाची सहमती आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.