Administration bows to teachers’ unions close to the ruling party : प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक बदलले; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांच्या सुट्ट्यांना प्राधान्य?
Amravati राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जवळच्या शिक्षक संघटनेच्या दबावाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक बदलल्याचा आरोप होत आहे. उन्हाळ्यातील शिक्षकांच्या सुट्टीचे कारण पुढे करत संबंधित शिक्षक संघटनेने केलेल्या मागणीला विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिला आहे.
विद्यापीठाने ३ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, काही शिक्षक संघटनांनी याला विरोध करत “शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांत परीक्षा घेणे अयोग्य आहे” असे नमूद करत वेळापत्रक बदलण्याची मागणी केली.
Invalid ration card search campaign : अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम; गरिबांच्या रेशनवर गंडांतर?
शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळी सुट्टी ही वैयक्तिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार (CBCS/NEP) विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके किंवा इंटर्नशिप सुट्टीच्या कालावधीतच पूर्ण करायची असते. अशा परीक्षांचे नियोजन केल्यास विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय यंत्रणा कोलमडू शकते. याशिवाय ग्रामीण भागातील परीक्षक अनुपलब्ध राहू शकतात, आणि मे महिन्यातील असह्य उष्णतेचा विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही त्यात नमूद करण्यात आले.
Buldhana incident : उष्माघात नव्हे, मेंदूज्वर? सहावीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शेगाव हादरलं!
विद्यापीठ प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, प्रात्यक्षिक परीक्षा ७ मेऐवजी आता २० एप्रिल २०२५ पासून घेण्याचे महाविद्यालयांना कळविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनीच परीक्षा वेळापत्रकाच्या विरोधात आंदोलने केली होती. मात्र यंदा शिक्षकांनी स्वतःच्या सुट्टीच्या काळात परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. हे पाहता, उन्हाळ्यातील परीक्षांचे नियोजन, त्यातील प्राधान्यक्रम, आणि विद्यार्थीहित या बाबी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार हे निश्चित आहे.








