Breaking

BJP Congress : शेगावमध्ये शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

Curiosity among political parties about the post of city president : भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

Buldhana विधानसभा निवडणुकीतील अपयश, शेगावचे विद्यमान शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांचा राजीनामा आणि संघटनात्मक बदलांचे संकेत यामुळे काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे, दोन कार्यकाळ पूर्ण केलेल्या भाजपच्या शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे यांच्या जागीही नव्या नेतृत्वाच्या शोधाला गती मिळाली आहे.

दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये सध्या या पदासाठी रस्सीखेच सुरु असून, शहराध्यक्षपदासाठी कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपकडे इच्छुकांची भली मोठी रांग आहे. पक्षाच्या गोटात माजी नगरसेवक विजय यादव यांचे नाव आघाडीवर आहे. ते मराठा चेहरा आणि युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राहिले आहेत. आमदार डॉ. संजय कुटे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

School security : ९८ टक्के जिल्हा परिषद शाळा सीसीटीव्ही विना!

त्याचबरोबर गजाननराव जवंजाळ, पवन महाराज शर्मा, राजू अग्रवाल, बाळू घोराडे, सचिन धमाळ या नावांची देखील रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये शहराध्यक्षपदाचा निर्णय अंतिमतः आमदार कुटे यांच्याच मंजुरीनंतर होणार, हे स्पष्ट मानले जात आहे.

दुसऱ्या बाजूला, काँग्रेस पक्ष संघटनाला नवसंजीवनी देण्यासाठी तयारीला लागला आहे. पक्ष नेत्या सौ. स्वाती वाकेकर यांनी बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. शहराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शैलेंद्रदादा पाटील, शिवाजीराव बुरूंगळे, कैलासबाप्पू देशमुख, डॉ. असलम खान ही नावे चर्चेत आहेत.

Political conflict in Akola over Rangoli: रांगोळीवरून अकोल्यात राजकीय संघर्ष!

यापैकी शैलेंद्रदादा पाटील हे माजी नगराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, आणि अनुभवी प्रशासकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तर कैलासबाप्पू देशमुख यांचे युवक काँग्रेस, रोटरी क्लब व सामाजिक कार्यात योगदान असून, ते देखील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.