व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण कोहळे की सोले? भाजपात उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता; देवाभाऊंच्या मनात नेमकं काय?

कोहळे की सोले? भाजपात उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता; देवाभाऊंच्या मनात नेमकं काय?

डेडलाईन जवळ आली तरीही अद्याप घोषणा नाही; अनिश्चितता कायम

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाच भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. पक्षाने येत्या ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले असले तरी, अद्याप अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. ‘देवाभाऊ’ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमके कोणाचे नाव आहे, हे सांगता येत नसल्याने भाजपच्या बड्या नेत्यांनीही या विषयावर थेट कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोहळे की सोले असा मोठा पेच निर्माण झाला आहे.

भाजपने पदवीधर मतदार नोंदणीचे प्रमुख म्हणून सुधाकर कोहळे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती आणि गेली वर्षभर त्यांच्याच नेतृत्वात मतदार नोंदणीचे काम चालले आहे. वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिल्यामुळे कोहळे हेच उमेदवार असतील असा दावा त्यांचा गट करत आहे. असे असले तरी जोपर्यंत अधिकृत कागद हातात येत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत नाही असे कोहळे यांचे म्हणणे आह. मात्र नेत्यांनी शब्द दिला असून वर्षभरापासून केलेल्या कामाच्या जोरावर तिकीट मिळेल अशी आशा आहे, अशी सावध भूमिका मांडली आहे.

शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दुसरीकडे, माजी आमदार अनिल सोले यांनीही पुन्हा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू करत स्वतंत्र मतदार नोंदणी केली आहे. मागील निवडणुकीत सोले यांचे तिकीट अचानक कापण्यात आले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्य भूमिकेत होते आणि आताही तेच आहेत. हा इतिहास ताजा असल्याने सध्या कोणीही ठाम दावा करायला तयार नाही.

मात्र, नागपुरातील आजी-माजी आमदार, ज्येष्ठ पदाधिकारी आणि जुन्या कार्यकर्त्यांचा कौल अनिल सोले यांच्याकडेच असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सोले यांच्या वाढदिवसाच्या सत्कारासाठी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला होता. दोन्ही नेत्यांचे समर्थक आपल्याच पाठीशी उमेदवारी राहील या आशेवर असून ५ ऑक्टोबरच्या मुहूर्तापूर्वी देवाभाऊ कोणाच्या नावाची लॉटरी काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!