Historical event in Kavla Gram Panchayat : ग्रामस्थांचा अविश्वास; सरपंचाला व्हावे लागले पायउतार!

 

The sarpanch had to step down after the villagers showed distrust : कव्हळा ग्रामपंचायतीत ऐतिहासिक घटना; ११ सदस्य होते नाराज

Buldhana चिखली तालुक्यातील कव्हळा व सावरखेड गट ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र डाळीमकर यांच्याविरोधात ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करत त्यांना पदावरून हटवले आहे. विशेष म्हणजे, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला जनतेनेच स्पष्ट बहुमताने नाकारल्याची ही दुर्मिळ घडामोड आहे.

ग्रामपंचायतीचे सर्व ११ सदस्य डाळीमकर यांच्या मनमानी कारभारामुळे नाराज होते. यामुळे त्यांनी २८ मार्च रोजी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. ३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सर्व सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. सरपंच थेट जनतेतून निवडून आले असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जनमत घेणे आवश्यक ठरले. त्यानुसार १७ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नायब तहसीलदार वैभव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली सावरखेड येथील माध्यमिक शाळेच्या परिसरात सभा पार पडली.

Women and Child Welfare Department : गोंदिया जिल्ह्यात तीन महिन्यांत रोखले पाच बालविवाह

या ग्रामसभेत ४८३ मतदारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४७१ ग्रामस्थांनी मतदानात भाग घेतला. अविश्वास ठरावाच्या बाजूने ३६६ नागरिकांनी मतदान केले, तर केवळ १०५ मतदार ठरावाच्या विरोधात होते. १२ नागरिकांनी तटस्थ भूमिका घेतली. या निर्णायक जनमतामुळे सरपंच डाळीमकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. या वेळी महसूल व पंचायत विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLC Dhiraj Lingade : शिक्षणव्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारचा कट

विशेष सभेत ठराव मंजूर
ग्रामपंचायतीत एकूण १२ सदस्य आहेत, त्यापैकी ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. विशेष सभा ३ एप्रिल रोजी तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी संतोष काकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच डाळीमकर यांची मतदान गुप्त पद्धतीने घेण्याची मागणी कायदेशीर तरतुदीअभावी फेटाळण्यात आली, त्यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले होते.