व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास...

Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !

Sanjay Nirupam criticizes Shiv Sena Uddhav Thackeray’s party : उबाठा पश्चिम बंगालमध्ये हिंदुवर अत्याचार करणाऱ्यांसोबत आहेत

Mumbai : उद्धव ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेबांची विचारधारा सोडून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसशी घरोबा गेला. त्याचा परिणाम म्हणून उबाठा पक्ष आज लयाला जातो आहे. स्व. बाळासाहेबांचे भाषण एआयचा वापर करून दाखवणे, हे त्याचेच द्योतक आहे. आता उबाठा हा पक्षच कृत्रीम झाला, अशी जळजळीत टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.

मुंबईत आज (१८ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम म्हणाले, भविष्यातील राजकारणात काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर शिवसेनेचे दुकान बंद करेन, पण जाणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. पण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंनी केवळ आणि केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या हातात हात दिला. अख्खी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यामुळेच त्यांचे आज हे हाल झाले आहेत.

Atul Save : भविष्यातील शिक्षकांची फळी मुल्याधिष्ठ शिक्षणाची ज्योत पेटवणार !

एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार जोपासले आणि पुढे नेले, आजही नेत आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले. म्हणून तुम्हाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन बाळासाहेबांचे भाषण दाखवावे लागत आहेत, असा टोला निरुपम यांनी उबाठाला लगावला.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणारे उबाठा पश्चिम बंगालमध्ये हिंदुवर अत्याचार करणाऱ्यांसोबत आहेत, त्यामुळेच ते ममता बॅनर्जीचा निषेध करत नाहीत, असेही निरुपम म्हणाले. वक्फ बोर्ड कायद्यावर कोर्टाने मनाई केली आहे, असे मानणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे.

मंदिर ट्रस्टमध्ये इतर धर्मीयांना सदस्य करणार का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे, मात्र हा प्रश्न चुकीचा आहे. कारण वक्फ बोर्ड आणि मंदिर यांच्यात कोणताही संबंध नाही. वक्फ बोर्ड ही एक बिगर धार्मिक संस्था आहे तर मंदीर ट्रस्ट ही एक धार्मिक संस्था आहे. यामध्ये फक्त हिंदू धर्माचे लोक सदस्य असतात, असे निरुपम म्हणाले.

Amravati Airport : अमरावती विमानतळाच्या नामकरणावरून वातावरण पेटतेय !

वक्फ बोर्ड कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नाही. वक्फ ही बिगर धार्मिक संस्था आहे. त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून फंडिंग केले जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सन्मान होणे आवश्यक आहे. या धोरणामुळे मराठी मुले मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पारंगत होतील. इंग्रजी भाषेच्या सक्तीवर आक्षेप न घेणारे हिंदीवर आक्षेप घेत आहेत, हे एक राजकीय ढोंग आहे, असे ते हिंदी भाषा सक्तीबाबत म्हणाले.

error: Content is protected !!