withdrawing the protest without the resignation of Dharmendra Pradhan was a mistake, Sanjay Raut takes an aggressive stand after Sonam Wangchuk ends his hunger strike : सरकारच्या नाकावर टिचून त्याच जागेवर उपोषण कायम ठेवायला हवे होते, राऊतांची भूमिका
Mumbai लडाखच्या पर्यावरण आणि हक्कांच्या रक्षणापर्थासोबतच नीट पेपर फुटीवरून विद्यारथ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण मध्यरात्री अचानक मागे घेतल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वांगचूक यांनी उपोषण सोडायला नको होते, असा आक्रमक पवित्रा राऊत यांनी घेतला आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गेल्या २६ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अत्यंत निष्ठेने हे आंदोलन चालवले होते आणि यादरम्यान २० जणांचा बळी गेला आहे. मात्र, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांशी थेट संबंधित असलेल्या या विषयावर कोणतीही ठोस चर्चा न करता, सरकारने केवळ स्वतःचे श्रेय घेण्यासाठी मध्यरात्री वांगचूक यांचे उपोषण सोडवून घेतले. धर्मेंद्र प्रधान हे या प्रकरणातील मूळ आरोपी असून, त्यांचा राजीनामा घेणे अत्यंत आवश्यक होते, असे ते म्हणाले.
Dadar protest : दादर आंदोलनातील व्हिडिओवरून खळबळ; विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप
आंदोलनाची अप्रतिष्ठा केल्याचा आरोप करत राऊत पुढे म्हणाले की, ज्या जंतरमंतरवरून या सरकारने सोनम वांगचूक यांना फरफटत नेले होते, त्याच ऐतिहासिक जागेवर उपोषण सुटायला हवे होते. हे केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नसून देशभरातील लाखो लोकांचे लढा आहे. या हुकूमशाही सरकारच्या नाकावर टिचून त्याच जागेवर उपोषण कायम ठेवले असते, तर त्याचे अधिक तीव्र पडसाद उमटले असते. परंतु, सरकारने यंत्रणेचा गैरवापर करून हे आंदोलन दाबून टाकले आणि वांगचूक यांना ‘परदेशी एजंट’ ठरवून बदनाम करण्याचे प्रयत्न केले, अशी टीकाही त्यांनी केली.
Sonam Wangchuk : २६ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय
संजय राऊत यांनी आमचे या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचे सांगत, सरकार कितीही चर्चा टाळण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असले, तरी जनमानसातील हा रोष सहजासहजी शांत होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, सोनम वांगचूक यांनी ही लोकशाहीची लढाई अशीच कायम ठेवावी. त्यांचे प्राण देशासाठी महत्त्वाचे आहे. सलग 26 दिवस उपोषण करणे साधी बाब नाही. अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले त्याच दिवशी ते संपले याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले.








