Ajit Pawar : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणू, नातेवाईकांनी घाबरू नये !

 

Minister Girish Mahajan leaves for Srinagar, CM Devendra Fadnavis gives information : मंत्री गिरीष महाजन श्रीनगरसाठी रवाना

Mumbai : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पर्यटकही तेथे अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीनरून थेट संपर्क साधला आणि तातडीने मदत पुरवण्याची विनंती त्यांना केली आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुखरूप परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देणे, हीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे अजित पवार यांनी सांगितले. सर्व पर्यटकांना आणण्यासाठी केंद्र सरकार जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहे. पर्यटकांना सर्व मदत मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देम्यात आल्या आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सांगितलेले आहे. जास्तीत जास्त विमाने पाठवून पर्यटकांना लवकरात लवकर परत आणण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

NCP Ajit Pawar Politics : तटकरेंना अॅलर्जी ‘संग्राम’ नावाची की मराठ्यांची ?

दरम्यान मंत्री गिरीष महाजन श्रीनगरसाठी रवाना होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृतांपैकी संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थीव श्रीनगर ते मुंबई या एअर अंडियाच्या विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. हे विमान श्रीनगरमधून दुपारी १२.१५ वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थीव सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थीव दुपारी १.१५ वाजता निघणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!

मुंबईत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री आशीष शेलार मुंबई विमानतळावर समन्वयक म्हणून काम करतील. तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली जात असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगतिले.