Demand to name the airport after Sant Gulabrao Maharaj : संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यासाठी निवेदन, बैठकीत ठराव
Amravati अमरावती विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या मूळ गाव माधान (ता. चांदूर बाजार) येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थानने केली आहे. विशेष म्हणजे एकीकडे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याचीही मागणी होत आहे. दोन्ही नावं अत्यंत मोठी आहेत. त्यामुळे आता या मुद्यावरून सरकारच कैचीत सापडले आहे.
संस्थानने याबाबत तातडीची सभा घेऊन ठराव मंजूर केला आहे. विश्वस्त रमेश मोहोड यांनी हा प्रस्ताव मांडला. साहेबराव मोहोड यांनी त्यास अनुमोदन दिले. नामकरणासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे Swati Pande, खासदार बळवंतराव वानखडे आणि आमदार प्रवीण तायडे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा
संत गुलाबराव महाराज यांचा जन्म बेलोरा विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावरील लोणी टाकळी येथे झाला होता. केवळ नवव्या महिन्यात त्यांची दृष्टी गेली. त्यांनी माधान येथे आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. केवळ ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १३४ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी योगशास्त्र, संगीत, काव्य, आयुर्वेद व नीतिशास्त्राचा गहन अभ्यास केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर त्यांनी सखोल विचार मांडले. ‘माऊली संप्रदाय’ स्थापन करून त्यांनी नवीन नावांगलीपीची निर्मिती केली.
Vidarbha Farmers : महाराष्ट्र दिनाला काँग्रेस उतरणार रस्त्यावर?
दुसरीकडे, विमानतळाला भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याचीही मागणी काही मंडळांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या नावाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था आणि अकोल्यातील कृषी विद्यापीठ आहे. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही विश्वस्त मंडळाने केली आहे.
विमानतळाच्या नामकरणासाठी दोन मान्यवरांची नावे चर्चेत असताना, प्रशासन आणि सरकारने या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.