Breaking

Eknath Shinde : उद्या उपमुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात, तर आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल !

DCM Eknath Shinde to be in Buldhana tomorrow, while a case will be registered against MLA Sanjay Gaikwad : मेळाव्यावर विरजण पडण्याची शक्यता

Buldhana : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्याच्या पूर्वसंध्येला आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

MLA Amol Mitkari : सहकार नेत्यांनी पक्ष घरगड्यासारखा वापरला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (२७ एप्रिल) बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा घेत आहेत. या मेळाव्याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. अशात आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मेळाव्यावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फटकळ बोलण्यामुळे आमदार गायकवाड नेहमीच अडचणीत येतात. आपल्या गळ्यात जो दात आहे, यासाठी आपण वाघाची शिकार करून हा दात गळ्यात बांधला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तेव्हाही ते चांगलेच अडचणीत आले होते. आमदार गायकवाड यांच्या विरोधात बीएनएस २९६, ३५२ व पोलिस अधिनियम १९२२ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.