Amravati-Mumbai Express should be taken up to CST station : अमरावती – मुंबई एक्सप्रेस सीएसटी स्थानकापर्यंत न्या, आमदाराची मागणी
Akola अमरावती – मुंबई एक्सप्रेस ही पूर्वी सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्थानकापर्यंत जायची आता मात्र ही रेल्वे फक्त दादर स्थानकापर्यंत जाते, परिणामी अमरावती अकोला वरून मुंबई येथे जाणाऱ्या नागरिकांना दादर येथेच उतरावे लागत आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व अडचणी लक्षात घेता अमरावती – मुंबई रेल्वेला पूर्वरत सीएसटी येथे थांबा द्यावा. अशा मागणीचे निवेदन पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी रेल्वेचे उप महाव्यवस्थापक कुश किशोर मिश्रा यांची भेट घेत त्यांना दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया उपस्थित होते.
अमरावती – मुंबई ही रेल्वे माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सदर गाडी सुरू झाल्यावर या गाडीचा थांबा हा सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्थानकापर्यंत होता. मात्र काही काळाआधी सदर गाडीचा मार्ग बदलून ती केवळ दादर पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती मुंबई या रेल्वेतून अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी आणि प्रवासी प्रवास करतात.
Anti-Corruption bureau : सापळा रचला अन् ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!
सद्यस्थितीत मात्र सदर रेल्वे ही दादर पर्यंत मर्यादित असल्याने या वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी सदर रेल्वेला पूर्वीप्रमाणे सीएसटी पर्यंत नेण्यात यावे, तसेच सदर रेल्वे सुरू होऊन अनेक वर्ष झाली आहे त्यामुळे तिच्या डब्याचे नूतनीकरण करण्यात यावे जेणेकरून या भागातील प्रवाश्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल अशी मागणी साजिद खान पठाण यांनी निवेदनाद्वारे केली.
तर यावेळी रेल्वे विषयक आणखीन महत्त्वपूर्ण विषयावर तोंडी चर्चा सुद्धा करण्यात आली असून या सर्व विषयांवर गांभीर्याने विचार करून योग्य ती पाऊले उचलली जातील असा विश्वास यावेळी उपमहाव्यवस्थापक मिश्रा यांनी व्यक्त केला.