Breaking

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम !

Stayed for three hours at the agriculture office for crop insurance of Buldhana : पिकविम्यासाठी पुन्हा आक्रमक; कृषी कार्यालयात तीन तास ठिय्या

Buldhana पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांसह कृषी कार्यालय गाठून तब्बल तीन तास ठिय्या देत अधिकाऱ्यांना घाम फोडला. गेल्या वर्षीच्या पिकविम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळालेला नाही. त्यांना तातडीने पिकविमा मिळावा यासाठी बुलढाणा जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात तुपकर पोहोचले. त्यानंतर तीन तास त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

तुपकरांनी शेतकऱ्यांसह कार्यालयात धडक देत तीन तास ठिय्या मांडला. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकरावजी कोकाटे यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली. तातडीने शेतकऱ्यांना पिकविमा देण्याची मागणी त्यांनी केली. पिकविमा आणि नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. अगदी गल्ली-बोळापासून ते मुंबईपर्यंत त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. गेल्या महिन्यातच त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात धडक दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आक्रमक होत रविकांत तुपकरांनी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालय गाठले.

HMPV : विषाणूला घाबरू नका!

अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत अहवाल तयार केला. त्यातील पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही.

त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीची कारणे देऊन अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित रक्कम मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

Akola MNS : शाळांमध्ये सिक रूम बंधनकारक करा !

त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून द्यावा. वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी मंत्र्यांकडे केली. रविकांत तुपकरांनी कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी देखील सविस्तर चर्चा केली. पण पैसे मिळाले नाहीत तर राज्यव्यापी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला आहे.