Breaking

Shiv Sena : ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम, राष्ट्रवादीलाही दिला धक्का !

 

Shiv Sena becomes stronger in Thane, gives shock to NCP too : मनपाच्या विरोधी पक्ष नेत्यांसह माजी नगरसेवकांचा प्रवेश

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरूच आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांसह माजी नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशाने ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा धक्का दिला आहे.

कल्याण – डोंबीवली लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी काल (८ मे) शिवसेनेत प्रवेश घेतला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षालाही शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.

New Education Policy : आता नोंदणीशिवाय शाळा भरणार नाही!

ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Anti Corruption Bureau : सातबाऱ्यावरून नाव कमी करण्यासाठी मागितले ८०० रुपये

ठाणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दीघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील ७८ नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना काम् करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरू असते, याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.