व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Property tax hike :वाढीव मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचा एल्गार; विशेष सभेची अधिकृत मागणी

Property tax hike :वाढीव मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचा एल्गार; विशेष सभेची अधिकृत मागणी

Congress stages protest against property tax hike : चिखलीत वाढीव करावरून राजकारण तापले; काँग्रेसचे मुख्याधिकारी यांना निवेदन

Chikhli चिखलीकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादणाऱ्या नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर आता सभागृहातही जनतेची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ मधील कलम ८१ अन्वये विशेष सभा बोलाविण्याची अधिकृत मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.

वाढीव मालमत्ता कराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणारा हा वाढीव कर तात्काळ रद्द करून त्यासंदर्भातील ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

contaminated water supply : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात युवासेना रस्त्यावर; पाण्याच्या टाकीवर पाच तास ठिय्या आंदोलन

जनतेच्या प्रश्नांवर केवळ घोषणाबाजी न करता कायदेशीर मार्गाने संघर्ष उभारला जात असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यानुसार आवश्यक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह विशेष सभा बोलाविण्याची मागणी नियमानुसार प्रशासनाकडे दाखल करण्यात आली आहे. आता प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने विशेष सभा बोलावून वाढीव कर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी काँग्रेसने इशारा दिला की, प्रशासन किंवा सत्ताधारी जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असतील, तर सभागृहापासून रस्त्यापर्यंत तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल. चिखलीकरांवर अन्याय करणारा वाढीव कर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याची भूमिका काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्पष्ट केली.

Amravati municipal corporation : महापालिकेतील महायुतीत फूट? ६१ कोटींच्या ‘नॅकॉफ’ कंत्राटावरून युवा स्वाभिमानचा विरोध; भाजप-राष्ट्रवादीने बहुमताने दिली मंजुरी

‘जनतेच्या खिशावर टाकण्यात आलेला हा अतिरिक्त आर्थिक भार आम्ही दूर केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी व्यक्त केली. विशेष सभेत प्रत्येक नगरसेवकाने जनतेच्या हिताची भूमिका घेऊन मतदान करावे, असे आवाहनही करण्यात आले. वाढीव मालमत्ता कर रद्द होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!