Nitin Gadkari Dream Project : गोकुळपेठ बाजाराचा चेहरा मोहरा बदलणार !

Nagpur Improvement Trust will develop the market : नासुप्रचा निर्णय; कामाला मिळणार गती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवीन गोकुळपेठ मार्केटचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. धरमपेठ भागातील गोकुळपेठ मार्केट विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नागपूर सुधार प्रन्यासने या कामासाठी विकासकाची निवड केली आहे. या प्रकल्पातून नासुप्र आणि मनपाला ४९१ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

सध्या वर्दळीच्या भागात असलेल्या गोकुळपेठ मार्केटमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छता, पार्किंगसाठी अपुरी जागा यामुळे बाजार सतत गजबजलेला असतो. पण व्यापारी संकुलामुळे या सर्व अडचणींवर मात करता येणार आहे. नितीन गडकरी यांनी नागपुरात शहरात अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. गोकुळपेठ मार्केटदेखील त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.

Yavatmal : पोलीस बाहेर फिरत होते; ‘तो’ चौकीची तोडफोड करत होता !

रस्त्यावरच बसणारे भाजीविक्रेते, पावसाळ्यात होणारी गैरसोय, वाहतूक विस्कळीत होणे यांसारख्या समस्या गोकुळपेठ मार्केटमध्ये भेडसावतात. स्मार्टसिटीला न शोभणारे हे दृश्य बदलण्यासाठी याठिकाणी २६ मजल्यांची इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, यासाठी जुनी इमारत पाडून गोकुळपेठ मार्केट नव्याने बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३०० दुकानांना या इमारतीत सामावून घेतल्यानंतरही सुमारे ४२७ दुकाने व कार्यालये विक्रीसाठी उपलब्ध असतील, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

दुकानदारांचे नव्या इमारतीत पुनर्वसन
नासुप्रच्या ताब्यातील एकूण प्लॉटचे क्षेत्र १४ हजार २०५ चौरस मीटर आहे. यातील पार्किंगसाठी १ हजार ३९५ चौ.मी. आरक्षित आहे. ३ हजार ८८६ चौ.मी. जागेवर नासुप्रचे व्यापारी संकुल आहे. नासुप्रकडून २०४० पर्यंत लिजवर देण्यात आलेली दुकाने आणि कार्यालयांची संख्या ७३ आहे. महापालिकेच्या इमारतीतील दुकाने, ओटा, मटन शॉप यांची संख्या २२७ आहे. नवी इमारत बांधल्यानंतर या दुकानदारांचे नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे.