Breaking

Youth Congress : युवक काँग्रेसकडे बॅनर, पोस्टरचेही पैसे नाहीत!

Vendor who put up banners, posters is waiting for payment : वेंडरने पैसे मागितले तर पदाधिकारी धमकावतात, पोलिसांत तक्रार

Nagpur कित्येक दशके देशात, राज्यात आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसची फार वाईट अवस्था आहे. नेते आणि पदाधिकारी खाऊन-पिऊन गलेलठ्ठ झालेले असले तरीही संघटनेच्या पातळीवर मात्र अनेक अडचणी आहेत. एकेकाळी ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसकडेच आज बॅनर, पोस्टर, झेंड्यांचेही पैसे नाहीत, असे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

युवक काँग्रेसच्या निमित्ताने ही अवस्था चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी काम करणाऱ्यांना मोबदला देताना हात आखुडता घेतला जात आहे. नागपूर ते पुणे काढण्यात आलेल्या पदयात्रेसाठी बॅनर, झेंडे, पोस्टर, होर्डिंग आदी साहित्य लावणाऱ्या वेंडरचे अद्याप पैसे देण्यात आलेले नाहीत. पैशाची मागणी केली असता आपल्याला धमकावण्यात आले. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, अशी तक्रार वेंडर प्रशांत गायकवाड यांनी नागपूर पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Eknath Sinde Shiv Sena : काल पक्षात आले, आज कार्याध्यक्ष झाले!

त्यांच्या तक्रारीचा रोख युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे आहे. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील रिस कंबा येथील रहिवासी असलेले प्रशांत गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘युवक काँग्रेसच्या यात्रेचे बिल मागण्यासाठी आपण २५ एप्रिल रोजी नागपूर येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या घराबाहेरील प्रमुख रस्त्यावर गुजरात पासिंग असलेली कार घेऊन आलेल्या तीन-चार गुंडांनी माझी गाडी अडवून थांबण्यास सांगितले.’

‘मला गाडीतून खाली बोलावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अभिषेक वर्दन सिंग याने तू कुणाल राऊत यांना भेटायला त्यांच्या नागपूर येथील घरी का आला आहेस, अशी विचारणा केली. मी त्यांना सांगितले की, दादांनी काही कामगारांचे पैसे देणे बाकी आहे आणि त्याला एक महिना उलटून गेला आहे. कामगार गरीब आहेत आणि ते पक्ष कार्यालयावर उपोषणाला बसणार आहेत, हे सर्व आपण कुणाल राऊत यांच्या कानावर टाकण्यासाठी आलेलो आहे, असेही सांगितले.

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री म्हणतात, आपण तर मध्यप्रदेशलाही मागे टाकले!

त्यानंतर सिंग याने मला जिवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गायकवाड मला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. माझ्याकडून लाखो रुपये उकळण्यासाठी, मला राजकीयदृष्ट्या त्रास देण्यासाठी, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी काही लोक सक्रिय आहेत. त्याचाच हा एक भाग आहे असे राऊत म्हणाले.