युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नाही : MNS leader Amit Thackeray’s letter to Prime Minister Narendra Modi
Mumbai : दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यानंतर देशभरात जल्लोष केला जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून देशभर तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. काल (१८ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वजिल्हा नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. या जल्लोषावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला यश मिळाले. पण युद्धाच निकाल अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे जल्लोष टाळावा आणि शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. सध्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशभर जो जल्लोष केला जात आहे, त्यावर अमित ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
No chief officer in Maharashtra : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा स्वराज्यातच अपमान !
पहलगाम हल्ल्यात ठार झालेले नागरिक आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान व नंतर शहीद झालेले जवान आणि नागरिकांचा आदर झाला पाहिजे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. २६ निष्पाप पर्यटकांनी जीव गमावला. २६ बहीणींचे कुंकू पुसले गेले. याचे दुःख भारत देशवासींच्या मनात अजूनही कुठेतरी आहे. सर्व दहशतवाद्यांवर ठोस आणि निर्णायक कारवाई व्हाही, ही जनभावना देशभरात आहे. त्यामुळे जल्लोष टाळावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केलेली आहे.
Revenue Department : ‘जिवंत सातबारा’तून पाच लाख नोंदी करण्याचा विक्रम !
पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, त्यावेळची माहिती सरकारने देणे गरजेचे आहे. हल्ला झाला त्यावेळी तेथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, असा प्रश्न यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी जल्लोष टाळण्याचे आवाहन केले आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.