Benefit of ‘Go-Green’ service by rejecting printed electricity bills : छापील वीज बिल नाकारत ‘गो-ग्रीन’ सेवेचा लाभ
Wardha जिल्ह्यातील ३ हजार २०१ वीज ग्राहकांनी छापील वीज बिल नाकारले आहे. कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी वीज बिलासाठी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडला. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रत्येक वीज बिलामागे दर महिन्याला १० आणि वर्षाला १२० रुपयांची सूट देण्यात येते. त्यामुळे वर्षाकाठी या पर्यावरणस्नेही ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होत आहे.
महावितरण (एमएसईडीसीएल) ने ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजना सुरू केली आहे. कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे आहे. हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत महावितरण ग्राहकांना त्यांचे वीज बिल ई-मेलद्वारे मिळते. ज्यामुळे कागदी बिलांचा वापर टाळता येतो. या योजनेमुळे झाडे वाचविण्यास मदत होते. कारण प्रत्येक महिन्यात लाखो कागदी बिले पाठवण्याची गरज कमी होते.
A boon for farmers : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ई-हक्क प्रणाली !
आता एक रकमी सूट मिळणार
महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना आता एकरकमी १२० रुपयांची सुट मिळणार आहे. नवीन वर्षानिमित्त महावितरणने हा निर्णय घेतला आहे. ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पेनेतून महावितरणची गो-ग्रीन योजना अस्तित्वात आली. जिल्ह्यात जवळपास साडे आठ हजार ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत.
ई-मेलवर वीजबील
आता यापुढे गो-ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे.