Breaking

Urology Department of Sawangi Hospital : रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेने केली जन्मजात व्याधीवर मात !

Robotic-assisted surgery overcomes congenital disease at Sawangi Hospital सावंगी रुग्णालयात उपचार; मूत्रविकार विभागात अतिदुर्मीळ शस्त्रक्रिया

Sawangi Hospital जन्मतः असलेली लघवीगळती आणि त्यात वाढत्या वयात सुरू झालेली पोटदुखी. यातून मार्ग काढत आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मदतीने २१ वर्षीय तरुणीचे जगणे सुखकर करण्यात आले. त्यासाठी अतिदुर्मीळ व जटिल शस्त्रक्रिया रोबोटिक सहाय्यतेने सावंगी (मेघे) आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील मूत्रविकार विभागात करण्यात आली.

सेलू तालुक्यातील एका गावात वास्तव्य असलेल्या या तरुणीला जन्मापासूनच सतत लघवी गळण्याचा त्रास सहन करावा लागत होता. बालपणापासून तर युवावस्थेत येईपर्यंत अनेक डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली. मात्र लघवीगळतीपासून तिची सुटका झाली नाही. वय वाढत असताना तिला डाव्या बाजूला तीव्र पोटदुखीचा त्रास नव्याने सुरू झाला आणि वाढत्या वयासोबत हा त्रासही दिवसेंदिवस वाढू लागला.

Mahametro : सोमलवाडा अंडरपाससाठी आणखी १२ दिवस वेटिंग !

तिला सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रविकार विभागाच्या तज्ज्ञांनी संपूर्ण तपासणी करीत योग्य निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्या केल्या. सीटी यूरोग्राफी व डीटीपीए स्कॅनच्या माध्यमातून रुग्णाच्या डाव्या बाजूची किडनी केवळ ३ बाय २ सेंमी आकाराची असल्याचे दिसून आले. सामान्यतः या वयातील स्त्रीच्या शरीरातील किडनीचा आकार १० बाय ४ सेंमी असतो.

याशिवाय, डाव्या बाजूची मूत्रवाहिनी प्रचंड फुगलेली आणि मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेली दिसून आली. किडनी आणि मूत्रवाहिनी कार्यक्षम नसल्यामुळे दोन्ही काढून टाकणे, हाच एकमेव उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र कमी वय आणि नाजूक शारीरिक ठेवण, यामुळे सामान्य प्रकारची शस्त्रक्रिया करण्याबाबत पुन्हा साशंकता निर्माण झाली. अखेर रुग्णाच्या शारीरिक स्थितीचा विचार करून शल्य चिकित्सक तज्ज्ञांनी रोबोटिक सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभिजित ढाले यांनी डॉ. जय धर्माशी, डॉ. शिवचरण भालगे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. वर्मा तसेच परिचारिका व तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने नेफ्रो युरेटरेक्टोमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेली. या प्रक्रियेत कार्यक्षम नसलेली डावी किडनी आणि फुगलेली मूत्रवाहिनी संपूर्णपणे काढून टाकण्यात आली.

CM Devendra Fadnavis ‘लाडक्या बहिणीं’साठीचे संकेतस्थळ बंद!

व्याधीतून झाली मुक्तता
शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक उपकरणांचा वापर करण्यात आला. त्यामुळे अधिक अचूक, कमीतकमी इजा पोचविणारी, कमी त्रासाची आणि रुग्ण व शल्य चिकित्सकांना पूर्णतः समाधान देणारी ठरली. शस्त्रक्रियेनंतर सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती आता पूर्णपणे या व्याधीतून मुक्त झाली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या मूत्रविकार विभागात प्रथमच करण्यात आली.

नवा मापदंड
दर्जेदार वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक रोबोटिक उपकरणे आणि डॉक्टरांचे कौशल्य यातून एक नवा मापदंड या रुग्णालयाने निर्माण केला. असे मत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक तथा रोबोटिक सर्जन डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी नमूद केले आहे.