Local Body Elections : युती-आघाडीचं लक्ष ओबीसी समाजावर!

Mahayuti & Mahavikas Aghadi focus on OBC community : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

Akola राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांनी विविध समाजघटकांचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ओबीसी समाजातील नेत्यांना महत्त्वाची पदे देत संघटनात्मक मजबुतीचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही याच दिशेने पावले टाकली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजाला संधी दिली आहे.

महापालिकेपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांपर्यंतच्या निवडणुका २०२२ पासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे राजकीय हालचालींना गती मिळाली आहे.

Rashtriya Swayamsewak Sangh : विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा!

जिल्ह्यातील ओबीसी मतांची संख्या लक्षात घेता विविध पक्षांनी संघटनात फेरबदल करत ओबीसी नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने अलीकडेच महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदी ओबीसी समाजातील व्यक्तींना नियुक्त केले. वंचित आणि शिवसेनेच्या ठाकरे गटानेही याआधीच ओबीसी जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. शिंदे गटाने तर नुकतीच दोन ओबीसी जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे.

Mahila Mukti Morcha : रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करा!

वंचित बहुजन आघाडीने नुकतीच महत्त्वाची बैठक घेतली असून, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी इच्छुक नेत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत आपला वंचित होणार नाही, या भीतीने इच्छुकांमध्ये हालचाल सुरू झाली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या लक्षात राहिल्याने पक्ष यंदा संघटनेत चोख मूल्यांकन करत आहे. कोणी पक्षासाठी मेहनत घेतली, कोणी फक्त नावापुरते काम केले, यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात वंचितने काँग्रेसचे माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब यांना संधी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संधी देण्यात आली.

Food and Drug Administration (FDA) : ‘केशरी’ रेशनकार्डधारक शेतकरी योजना केवळ कागदावरच

वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसींसह अल्पसंख्याक समाजालाही पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंचायत समिती, नगर परिषद व महापालिका निवडणुकांसाठी समन्वयक नेमण्यात आले असून, काही दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक नियोजनाविषयी दिशा ठरवण्यात आली.

शिवसेनेच्या शिंदे गटात सध्या उमेदवारांच्या निवडीवरून अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया आणि दोन जिल्हाध्यक्ष – श्रीरंग पिंजरकर व अश्वीन नवले – यांच्यात वाद निर्माण झाला आहे. हे मतभेद इतके वाढले की त्याची दखल पोलिसांपर्यंत घेण्यात आली आहे.

Maharashtra Congress : काँग्रेसच्या यात्रा संपेना, आता आत्मसन्मान पदयात्रा काढणार

ठाकरे गटातील नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर एक गट सकारात्मक असून दुसरा गट त्याला विरोध करत आहे. भाजपमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही नाराजी आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात पक्ष प्रवेशाच्या मुद्द्यावरून मोठे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.