व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Crime in Akola : अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या!

Crime in Akola : अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या!

Congress leader’s brother murdered in Akola : सार्वजनिक बांधकाम विभागत होते अभियंता; आरोपीला अटक

Akola अकोला येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू संजय कौसल यांनी अज्ञात कारणातून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना रणपिसे नगरमध्ये घडली. संजय हे सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंता आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी अकोला पोलिसांनी महेंद्र पवार या संशयिताला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवारने धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर वार करत त्यांचा जागीच खून केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Nagpur Municipal Corporation : तर एका मुसळधार पावसात वाहून जातील हजारो नागपूरकर

महेंद्र पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, याआधीही तो गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिला आहे. एका प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. तो सध्या जामिनावर बाहेर होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

संजय कौसल आणि आरोपी महेंद्र पवार हे दोघेही रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Chandrashekhar Bawankule : नुकसानाचा काटेकोर अहवाल तयार करा, कुणीही वंचित राहायला नको

अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नुकताच पदभार स्वीकारला असताना, त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच आठवड्यात ही खळबळजनक घटना घडल्याने त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

error: Content is protected !!