Breaking

Ajit Pawar NCP : खामगावात सानंदा, अकोल्यात कोण?

After Sananda, which leader from West Vidarbha will join NCP? : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अजितदादा पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर

Akola खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अकोला येथेही अजितदादांची बैठक होणार आहे. अकोला येथील कोणता नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागला आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या एका माजी महापौरांचे नाव यासाठी चर्चेत आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा अकोला जिल्हा दौरा लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगरतर्फे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. विदर्भ समन्वयक तथा आमदार संजय खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महानगराध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचे आता ‘अन्नत्याग आंदोलन’!

या नियोजन बैठकीत अजित पवार यांच्या अकोला दौऱ्याच्या तयारीसंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः खामगाव येथून त्यांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्याला सुरुवात होणार असल्याने, स्थानिक स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला महानगरातील पदाधिकारी, माजी व विद्यमान नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान अजित पवार विविध ठिकाणी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, स्थानिक प्रश्नांवरही चर्चा अपेक्षित आहे.

Local Body Elections : अधिसूचनेची प्रतीक्षा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष?

राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला आणि पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याचे संकेत दिले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.