Chief Minister Devendra Fadnavis said that now the days of war for water have come : पाणी जपून वापरण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Nagpur : एक दिवस असा येईल, की पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, असे भाकित काही वर्षांपूर्वी वर्तवले गेले होते. ते भाकित आता खरे ठरताना दिसत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू जलकरार मागे घेताच पाकिस्तान जगभरात मदत मागत फिरू लागला. यावरून पाण्याचे महत्व पटावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाण्यासाठी युद्धाचे दिवस आले. पाण्यासाठी आता देशा-देशांत किंवा राज्या-राज्यांमध्येच नव्हे तर जिल्ह्या-जिल्ह्यांमध्येही वाॅर सुरू झाले आहेत. नाशिक, नगर व मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये असे वाॅर पाहायला मिळतात. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर हाच उपाय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.
Local body elections in multiple phases: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार वेगवेगळ्या टप्प्यांत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री काल (ता. ७ जून) बोलत होते. आमदार डॉ. परिणय फुके, प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, प्रामुख्याने उपस्थित होते.
जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी एक टक्का पाण्यावर संपूर्ण जग व जीवन चाललेले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ कारणच पाणी होते. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. आता सिंचनाची बरीच कामे झाली आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून चांगले शास्त्रोक्त परिणाम दिसून येत आहेत. ज्या गावांत जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या गावांतील पाण्याची पातळी वर आली असून, दुष्काळाचा धोका कमी झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Voters Number : तुमच्यात दम असेल तर खरंच खुलासा करा, वडेट्टीवारांचे बावनकुळेंना आव्हान !
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी जनतेची पायपीट पहायला मिळाली. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी परिषदेत आता पाण्यासाठी युद्धाचे दिवस आले असून जपून पाणी वापरले पाहिजे असे आवाहन केले.