Congress leader Vijay Wadettiwar said where did BJP leader Chandrashekhar Bawankule gave the statistics : डीबेट करायची तयारी असेल तर या, आम्ही तयार आहो
Nagpur : सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला सपशेल नाकारले होते. सगळे सर्वे आणि जनमत त्यांच्या विरोधात होते. तरीही भाजपला ८९ टक्के यश कसं मिळू शकतं? त्यांनी १४९ जागा लढवल्या आणि त्यांपैकी १३२ जिंकल्या. येवढं यश मिळणं शक्य नाही. मतदानामध्ये घोळ करून, जगलरी करून आलेलं हे सरकार आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढल्यानंतर वडेट्टीवार आज (ता. ७ जून) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात विधानसभेत असं कधी झालं नाही. त्यामुळे आमची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. त्यांनी मतदानात घोळ केला. यावर ओपन डीबेट करायची त्यांची तयारी असेल तर यावं, आम्ही तयार आहोत. ओबीसींचे नाव घेऊन भाजपने सरकार स्थापन केले. पण ओबीसी तरूणांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप महायुती सरकार करत आहे.
Caste Census : जातीय जनगणनेचा निर्णय बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर !
यासंदर्भात वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, हे जगलरी करून आलेले सरकार आहे. मतांचा अनादर करून आणि फिक्सींग करून आलेले सरकार आहे. जनतेच्या भरोशावर जिंकून आलेले हे सरकार नाही. तर बेईमानी करूनच हे जिंकले आहेत आणि हेच नेमकं राहुल गांधी यांनी सांगितलं. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर तब्बल साडेआठ टक्के मतदान वाढले आहे, हे केवळ घोटाळा करूनच शक्य आहे.
Maharashtra Politics : राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे भाजपचा डाव !
कामठीमध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा पाच वर्षांत वाढलेली मते १७ ते १८ हजार होती आणि सहा महिन्यात ३५ हजार मते वाढली. ही आली कुठून? ही वस्तुनिष्ठ माहिती राहुल गांधींनी त्यांच्या लेखातून दिली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांना बेईमानी करायचीच होती, ती त्यांनी केली, असे म्हणत दम असेल तर खुलासा करा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना दिले.
Modi Government : नेहरुंनी विशेष अधिवेशन बोलावून लोकांना उत्तरे दिली होती, अन् आता..
राहुल गांधी यांनी दिलेल्या लेखामध्ये आकडेवारी आहे. ते ३० हजार मतदान वाढले म्हणजे पाच वर्षांत वाढले. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सहा वाजता मतदान बंद झाल्यानंतर वाढलेली संख्या ८.७ म्हणजे जवळपास पावणेनऊ टक्के आहे. प्रक्रिया संपल्यानंतर ते कसे वाढू शकते? आकडेवारी जाहिर करताना ५० ते ५५ लाख मतं कशी वाढू शकतात? आधी ५०.८ आकडेवारी दिली होती. मग फुगवून ५८ टक्के नंतर ६४ ते ६५ टक्के दाखवली. त्यामुळे हे अतिशय स्पष्ट आहे की बेईमानीने आलेले हे सरकार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.








