Bachchu Kadu Visit : भाजपचे पक्षांतर जोरात, मात्र ‘भावांतर’ केव्हा ?

NCP MLA Rohit Pawar targets the grand alliance government : कंत्राटदारांना गब्बर करण्यासाठी पैसा, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही

Nagpur : महाराष्ट्रात बसलेले महायुती सरकार ढोंगी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सत्तेत येण्यापूर्वी म्हणत होते. आज काय परिस्थिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. तुम्ही कोट बदलता मात्र शेतकऱ्यांचा रेनकोट बदलता आला नाही. पिकांना भाव मिळत नाहीये. भाजपचे पक्षांतर जोरात सुरू आहे. मात्र भावांतर (शेतीमालाचे भाव) योजना अद्याप आणली नाही, असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदोनलनाला भेट देण्यासाठी रोहित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. तरी कापूस, सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांची चेष्ठा सुरू आहे. येवढे नुकसान झाल्यावर सरकार दखल घेणार नसेल, तर त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मी येथे शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांना पाठींबा देण्यासाठी आलो आहे.

Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !

शेतकरी आणि बहीणींचे भरभरून मतदान मिळवून घेतले आणि आता त्यांनाच वाऱ्यावर सोडले. तिन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख आहे. रस्ते करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत. कंत्राटदारांना मोठे करण्यासाठी हा पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे पैसै नाहीत, हे खेदजनक आहे. मंत्र्यांना विदेशात नेणे, आयपॅड देणे, यासाठी पैसा आहे. मात्र जनतेसाठीच पैसा नाही. त्यामुळे जनतेच्या मनांत सरकारच्या विरोधात रोष पनपत आहे, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.