Breaking

Local Body Elections : जुने गण-गट कायम; नव्या आरक्षणावर सर्वांचे लक्ष

Final plan of ward structure by August 18 : प्रभाग रचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; १८ ऑगस्टपर्यंत अंतिम आराखडा सादर होणार

Amravati जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी २०११ च्या जनगणनेचे निकष कायम ठेवत गण आणि गटांची विभागणी व प्रभागरचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. यानुसार १८ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी प्रभागरचना अंतिम करून विभागीय आयुक्तांकडे सादर करतील.

ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचनेचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५९ गट व प्रत्येक गटांत पंचायत समितीचे दोन अशा एकूण ११८ गण निश्चित करण्यात आले आहेत.

Local Body Elections : गडचिरोली ते बुलढाणा… भाजपकडून निवडणुकीची जोमाने तयारी!

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या १८ लाख ४ हजार ५१४ आहे. त्यापैकी ३ लाख ३८ हजार ९०४ अनुसूचित जाती आणि ३ लाख ६० हजार ३९० अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे. या प्रमाणावर गण-गटांची प्रभागरचना करून आरक्षण निश्चित केले जाईल. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हास्तरावर काढण्यात येईल, तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत शासनस्तरावर घेतली जाणार आहे.

जिल्ह्याची प्रभागरचना

एकूण जिल्हा परिषद गट : ५९
अनुसूचित जाती आरक्षित : ११
अनुसूचित जमाती आरक्षित : १२
महिला (नामनिर्देशित) आरक्षित : १८
सर्वसाधारण : १८

Sanjay Raut on Plane Crash : सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का?

तालुकानिहाय गण व गटांची विभागणी

धारणी ५ गट (१० गण), चिखलदरा ४ (८), अंजनगाव ३ (६), अचलपूर ६ (१२), चांदूरबाजार ६ (१२), मोर्शी ५ (१०), वरुड ५ (१०), तिवसा ३ (६), अमरावती ५ (१०), भातकुली ३ (६), दर्यापूर ४ (८), नांदगाव ४ (८), चांदूर रेल्वे २ (४) आणि धामणगाव ४ गट (८ गण) अशी प्रभागरचना असेल.

Iran vs Israel Conflict : इस्रायलला इराणचे हल्ल्याने प्रत्युत्तर, संघर्षात आतापर्यंत काय घडले महत्वाचे 10 मुद्दे!

मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम
मतदान टक्का वाढवण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये मतदार यादी तपासण्यासाठी संकेतस्थळ, ॲप, दूरध्वनी, कॉलसेंटर, चॅटबॉट उपलब्ध करून देणे, शपथविधी कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांत स्पर्धा, फलक व होर्डिंग्ज लावणे, स्वयंसेवी संस्था व प्रसिद्ध व्यक्तींच्या मदतीने प्रचार आणि राजकीय पक्षांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येईल.