BJP city president upset over the entry of Badgujar : बडगुजरांच्या प्रवेशावर भाजप शहराध्यक्षाचा घरचा आहेर, आ. हिरेंची नाराजी कायमच
Nashik नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून म्हटलंय, होय. भाजप वॉशिंग मशिन आहे. इतर राजकीय पक्षांमधुन भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाहीत. तर दुसरीकडे आ. सीमा हिरे यांची नाराजी कायम आहे.
शिवसेना ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत नाट्यमय घडामोडी समोर आल्या. एका बाजुला बडगुजर यांनी शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून नाराजी आहे. आ. सीमा हिरे यांनी टीका करताना बडगुजर यांच्या सगळ्या कारस्थानाची माहिती दिली होती. त्यांना पक्ष श्रेष्ठींनी प्रवेश थांबवल्याचं सांगितलं होतं.
स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याचंही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं. या घडामोडींवर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून स्पष्ट केले, होय. ‘भाजप वॉशिंग मशिन आहे’. इतर राजकीय पक्षांमधुन भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मोबाईल नंबर डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पहाता जे-जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती, ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील.
इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडुन भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे.शेवटी लोकशाही पध्दतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते.त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरु झाला होता. त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपात कोणी येत असेल व पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणत होते ‘मला माहित नाही’, त्यांच्याच उपस्थितीत पक्षप्रवेश
दरम्यान आ. सीमा हिरे यांनी म्हणले आहे की, १५ वर्षांपासून बडगुजरांच्या विरोधात लढत आहो, आता सोबत काम करणे केवळ अशक्य बडगुजर यांना आमचा नेहमीच विरोध राहिलेला आहे. त्यांनी आमच्या विरोधात काम केले. देशद्रोही गुन्हेगारां सोबत पार्ट्या करत नाचत फिरले. गोळीबार केला, बडगुजर यांना आमचा विरोध कायम राहील.
आमच्या घरातील तिसरी पीढी भाजपमध्ये काम करत आहे. सासरे पोपटराव हिरे पक्षाच्या स्थापनेपासून आहेत. ते प्रदेश सरचिटणीस होते. त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. मी स्वतः आणि आता आमची मुलंही पक्षाचे काम करत आहेत, असेही सिमा हिरे यांनी स्पष्ट केले आहे