व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: उद्या मतमोजणी; सकाळी 8 वाजता सुरू होणार प्रक्रिया

Nagpur नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता ताणली गेली असून उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असतानाही काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची धार अद्याप कमी झालेली नाही. निवडणुकीपूर्वी एकाच फोन नंबरवरून सुमारे २० ते २२ हजार मतदारांची बोगस नोंदणी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला होता. आता प्रत्यक्ष मतदानानंतर, पदवीधर नसलेल्या अनेक बोगस मतदारांनी मतदान केल्याचा नवीन आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी केला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच काँग्रेसने आधीपासूनच पराभवाचे खापर फोडण्याची सोय करून ठेवली असल्याचा जोरदार पलटवार भाजप नेत्यांनी केला आहे.

या पदवीधर निवडणुकीत तब्बल ६५ टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हे वाढीव मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दोन दिवस नागपूरमध्ये मुक्कामी होते. सुरुवातीला संथ गतीने चाललेले मतदान पाहून त्यांनी अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर भाजपची संपूर्ण यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदानाची विनंती करण्यात आली. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ६० च्या पार गेला, ज्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून ही वाढीव मते आपलीच असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

परराज्यात प्रभारी; अमित झनक यांची नवी इनिंग?

दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी मतदानाची ही टक्केवारी आपल्यासाठी अपेक्षितच असल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत ‘झेन झी’ म्हणजेच तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तरुण वर्ग सध्या भाजपच्या धोरणांवर, पेपरफुटीच्या घटनांवर आणि जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे ही सर्व मते काँग्रेसच्या बाजूने वळली असून, आपण मतदानाचे काटेकोर नियोजन केल्याने ही वाढीव मते आपल्यालाच मिळतील, असा ठाम विश्वास वंजारी यांनी व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्री पंकज भोयर आक्रमक!

दरम्यान, निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एकाच फोन नंबरवरून २० ते २२ हजार मतांची संशयास्पद नोंदणी झाल्याचे उघड करत मोठी खळबळ उडवून दिली होती. आता प्रफुल गुडधे यांनी पदवीधर नसलेल्या लोकांनीही मतदान केल्याचा दावा करत, त्यांची नोंदणी कोणी केली आणि प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे उद्या सकाळी आठ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीत नागपूर पदवीधरचा गड कोण सर करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!