Nationalist Ajit Pawar group MLA Amol Mitkaris demand: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांचे विठुरायाला साकडे
Akola : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे. पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक करावी, असं विठ्ठलाला साकडं घातल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अकोल्यातील आरोग्यनगर भागातील मिटकरी यांच्या
निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली. यावेळी त्यांनी रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली आहे. तसेच पालखीचे सहपरिवार स्वागत केलं. त्यांनी त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली.
Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या अपात्रेच्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मिटकरी म्हणाले की, मी पांडुरंगाच्या चरणी एकदाच साकडे घातले होते. आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी,
Raj & Uddhav Thackeray : संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू
दरम्यान, महा युतीत वेगवेगळ्या विषयावर आधीच धुसफूस सुरू असताना मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येतात याकडे राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. मिटकरींनी या आधीही असेच वक्तव्य केले होते आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदा बाबत इच्छा बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्यावर्षी मुख्यमंत्री होतील असे त्यांनी म्हटले होते.
___