Anniversary of both Shiv Sena marked by criticism and ridicule. : वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यात फक्त टीकेचा ‘धुरळा’
Mumbai: शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्चस्वावरून मोठी लढाई सुरू आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटांनी मोठ्या सभा घेऊन साजरा केला. यात महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकमेकांवर आरोपांचा, टीकेचा ‘ धुराळा’ उठल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला सिनेमाचा डायलॉग मारत ‘कम ऑन किल मी’ असे आव्हान दिले, तर शिंदेंनी ‘तुला आता कशाला मारायचे’ असे विचारत तुमची ताकद संपली आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.’ मी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, ॲम्ब्युलन्स घेऊन या कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा दिला. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला. ‘जर तुम्हाला वाटत असेल शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशान महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
Eknath Shinde Shiv Sena : मुंबईतील माजी नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, शिंदें गटात प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली. उद्धव ठाकरे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
Shivsena confict : ठाकरेंना ‘जय महराष्ट्र ‘ करत तीन माजी नगरसेवक शिंदेंकडे
बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणाऱ्या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्त्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे ते आता उतावीळ, लाचार झाले आहेत, अशी थ टीकाही शिंदे यांनी केली.ठाकरेंनी दिलेल्या ‘ कम ऑन किल मी’ ची खिल्ली उडवत शिंदे म्हणाले की, तुम्हाला आता कोण आणि कशाला मारेल. जनतेने तुम्हाला आधीच गाडून टाकले आहे.