Chief Minister’s presence at ‘Varkari Bhakti Yoga’ in Pune : पुण्यात ‘वारकरी भक्तियोग’ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Pune: आंतरराष्ट्रीय योग दिन जगासह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योगासने केली, तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी
देवेंद्रजी ‘योगी’च आहेत असे वक्तव्यं केलं. या सर्व कार्यक्रमांनी योगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे समजून सांगण्यात आले.
आज जगभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणकेऱ्यांसह मिळून योगासनं केली. तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत योग दिवस साजार केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा सुरू आहे.
Sudhir Mungantiwar : योग ही केवळ साधना नव्हे, तर असामान्य सामर्थ्याची अनुभूती !
‘देवेंद्रजी हे योगीच आहेत’. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात’ अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिली. आज 11 वा आंतरराष्ट्रीय दिवस आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत योग दिवस साजरा करत आहोत, असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.
Amit Shah : देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकरांसह योगासनं केली. आम्ही आज वारकऱ्यांसह योगासनं केली, पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला. प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.महाराष्ट्रातही विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.