No new registration since seven months : पोर्टल नोव्हेंबरपासून बंद, २१ वर्ष पूर्ण केलेल्या नव्या लाभार्थींना प्रतीक्षाच
Amravati राज्य सरकारच्या गाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत गेल्या सात महिन्यांपासून नवीन लाभार्थ्यांसाठी नो एन्ट्री आहे. नोव्हेंबर २०२४ पासून योजनेच्या नोंदणीसाठीचे पोर्टल बंद असल्याने नव्या लाभार्थींना अर्ज करता येत नाही. परिणामी २१ वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाली. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा सत्ता मिळाल्यास हे अनुदान २१०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. आजवर एकूण ११ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक
अमरावती जिल्ह्यात सुमारे ६ लाख ९७ हजार ५४८ महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांत योजनेतून काही महिलांनी माघार घेतली आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे अद्यापपर्यंत ४५ महिलांनी विविध कारणास्तव स्वतःहून अर्ज सादर करून लाभ घेणे बंद केले आहे.
Arvind Jagtap : पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं…!
—
❖ या कारणांमुळे महिलांची माघार
माघार घेणाऱ्या महिलांमध्ये—
दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळणे,
चारचाकी वाहन असल्याचे निदर्शनास येणे,
उत्पन्न मर्यादेच्या पुढे जाणे,
वयोमर्यादा ओलांडणे
आदी कारणांचा समावेश आहे.
Amruta fadanvis : योगदिनी अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्रजी ‘योगी’च
—
❖ योजना स्थिती एक नजरात
एकूण लाभार्थी : ६,९७,५४८
एकूण हप्ते वितरित : ११
माघार घेतलेले लाभार्थी : ४५