They had said, “Why dont you hire me?” Mahajan reminded them : ते म्हणाले होते मला का घेत नाहीत? महाजनांनी करून दिली आठवण
Pandhrpur/ Nashik: पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती, अगदी एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले हे अति झाले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आ. एकनाथ खडसे यांनी भाजपवर खरमरीत टीका केली. दरम्यान नाशिक येथे. या टीकेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनीही तिखट पलटवार केला आणि ते म्हणाले होते मी इतका वाईट नाही मला पक्षात का घेत नाहीत? याची आठवण करून दिली.
पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी एकनाथ खडसे आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, ते आज पक्षात असून 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज यांच्यासोबत आहेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विशेष म्हणजे आजच त्यांच्या सुन आणि केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे या देखील पंढरपूरमध्ये आल्या होत्या. त्या पंढरपुरातून गेल्यानंतर दुपारी एकनाथ खडसे पंढरपूरमध्ये आले. यावेळी बोलताना, भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला असून मी अडचणीत असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार असल्याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला.
Sanjay Raut : ट्रम्प मोदींचे मित्र पण भारताचे शत्रू, कसे ते संजय राऊतांनी सांगितले !
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का असे विचारले असता खडसेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चीट देत यासाठी त्यांना एकट्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार असल्याचे खडसेंनी म्हटले. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता, मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे म्हणत महाजन यांच्यावरही खडसेंनी टीका केली. तसेच, भाजपच्या विरोधात दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे याशिवाय सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
Girish Mahajan : भाजपचा दुपट्टा टाकला होता, असे म्हणत महाजनांचा खडसेंना टोला !
सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तेव्हा एकनाथ खडसे म्हणाले, त्यापेक्षा मी वाईट नाही, मला का घेत नाहीत. खडसे पक्षात येण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसतं, असेनसंगत मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मी लहान कार्यकर्ता आहे, ते दिल्लीत बोलले, त्यांचे कनेक्शन दिल्लीत आहे. मी त्यांच्याबद्दल काही टिपणी करणार नाही, कारण ते राष्ट्रीय नेते आहेत. दिल्लीत त्यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, त्याचे फोटो समोर येत नसल्याचा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.