व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उद्धव ठाकरे-फडणवीस बंददार चर्चा; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले काय घडले ते

उद्धव ठाकरे-फडणवीस बंददार चर्चा; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले काय घडले ते

नव्या राजकीय समीकरणांचे तर्क-वितर्क, शिंदे गटाची प्रतिक्रिया आली

Mumbai एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना उधाण आले आहे. या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंददार गुप्त चर्चा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नव्या राजकीय समीकरणांचे तर्क लावले जाऊ लागले असून, विशेषतः शिंदे सेनेत मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावत मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी कोणतीही बंददार चर्चा झालेली नाही; या सर्व केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी दिले.

दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी डॉ. फौजिया खान यांचा विदर्भ दौरा

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमेकांवर होणारी टोकाची चिखलफेक आणि ईव्हीएम व हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव-राज ठाकरे यांनी पुकारलेले संयुक्त आंदोलन या पार्श्वभूमीवर या भेटीच्या चर्चेने राजकीय वातावरण तापवले होते.
दुसरीकडे, महाविकास आघाडी घट्ट होत असताना महायुतीत मात्र सर्व काही अलबेल नसल्याचे समोर येत आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडखोरीवरून भाजप आणि शिंदे सेनेत थेट जुंपली असून पुण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वार सुरू आहेत.

शेतकरी आक्रमक; एमआयडीसीविरोधातील आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा आणि दोन्ही बाजूंकडून होणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे युतीतील दरी स्पष्ट दिसू लागली आहे. फडणवीस-ठाकरे भेटीच्या अफवेने या अंतर्गत धुसफुशीत आणखीच तेल ओतण्याचे काम केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या खुल्यासाने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. असे असले तरी महायुतीमधील राजीनाराजी चांगलीच वाढली आहे. शिंदे सेनेने पुण्याच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेपणाणे आपल्या उमेदवाराला समर्थन दिले होते. त्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने महायुतीचे नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भाजपने एक बंडखोर उमेदवाराला छुपा पाठिंबा दिला होता. त्यानंतरही शिंदेसेनेचा उमेदवार येथून निवडून आला आहे.

error: Content is protected !!